Amravati Crime: प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नेते, कार्यकर्ते यांच्यावर मोठ्या प्रमाणात हल्ले झाल्याच्या घटना समोर येत आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांसह भाजपच्या उमेदवाराच्या बहिणीवर चाकूने हल्ला झाला आहे. मतदानाला काही तास बाकी तास असताना या घटनांमुळे निवडणूक प्रक्रियेला गालबोट लागल्याचे चित्र आहे.
राज्यातील कायदा-सुवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात हल्ला, राडा झाल्याचे राज्यात हे प्रथमच घडत आहे. पुरोगामी महाराष्ट्र हे चाललंय काय? असा प्रश्न सध्या विचारण्यात येत आहे.
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार प्रताप अडसड यांच्या बहिणीवर चाकूने जीवघेणा हल्ला झाला आहे. सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सातेफळ फाट्याजवळ 7 ते 8 जण अज्ञातांनी त्यांच्यावर चालूने हल्ला केला. आमदार प्रतापदादा अडसड यांच्या भगिनी अर्चनाताई रोटे (अडसड) यांच्यावर चाकू हल्ला झाला. प्रताप अडसड यांच्या सर्व प्रचाराची धुरा त्यांच्या बहिणीकडे होती.
वंचित आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप म्हस्के यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. हिंगोलीतील कळमनुरी मतदारसंघातून ते निवडणूक लढवत आहे. रात्री एक वाजण्याच्या सुमारास हा म्हस्के यांच्यावर पाच ते सहा जणांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात कोसंबी येथेही सोमवारी रात्री काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यांच्यात जोरदार राडा झाला. घटनेत एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी प्रचाराची सांगता झाली तरीही भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार हे कोसंबी येथे सभा घेत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. काँग्रेस कार्यकर्त्यांना हे समजताच त्यांनी सभेच्या ठिकाणी धाव घेऊन भाजप कार्यकर्त्यांना त्याचा जाब विचारला. यावेळी त्यांच्यात शाब्दीक वाद झाला. दोन्ही गटात मारामारी झाली.
अपक्ष उमेदवाराच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना छत्रपती संभाजी नगरमधील गंगापूर विधानसभा मतदारसंघात घडली. उमेदवाराच्या कारवर दगडफेक झाली. सुरेश सोनवणे असे त्याचे नाव आहे. सोनवणे यांची गाडी गळणीम रोडवर अडवण्यात आली. त्यांच्या गाडीवर 8 ते 10 जणांनी दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये उमेदवार सोनवणे यांच्यासह चार ते पाच जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वाळूज टोल नाक्याजवळील जवळील सी एस एम एस हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवरही सोमवारी रात्री दगडफेक करण्यात आली होती. यात देशमुखांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. ते काटोलकडे जात असताना बेलफाट्याजवल अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप देशमुखांनी केला आहे. पण हा आरोप भाजप नेत्यांनी फेटाळला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.