Ramdas Athawale News: रामदास आठवलेंना हव्या लोकसभेच्या दोन-तीन जागा, १०-१५ विधानसभाही मागणार !

Ramdas Athawale RPI News : आठवले गटाचे नागालँडमध्ये दोन उमेदवार विजयी झाले.
Ramdas Athavale
Ramdas AthavaleSarkarnama

Republican Party of India Ramdas Athawale News : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आठवले गट) लोकसभा निवडणुकीत दोन ते तीन आणि विधानसभा निवडणुकीत १० ते १५ जगांची मागणी भाजपकडे करणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज (ता. ६) नागपुरात पत्रकार परिषदेत दिली. (There will be an insistence to get a place in Vidarbha)

आठवले गटाचे नागालँडमध्ये दोन उमेदवार विजयी झाले. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यतेसाठी महाराष्ट्रात दोन ठिकाणी विजय आवश्यक आहे. त्यादृष्टिने जागा मिळविण्याचा प्रयत्न आहे. उमेदवार बघूनच जागांची मागणी केली जाईल. पण, विदर्भात एखादी जागा मिळावी, हा आग्रह असेल.

रामटेकमधील शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने सध्या आमच्या सोबतच असल्याने ही जागा मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्यासाठी आग्रह नाही. आपली खासदारकीची मुदत २०२६ पर्यंत आहे. यामुळे जागा मिळावी, असे वाटत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिर्डीतून लोकसभेची निवडणूक लढविली त्यावेळी कोपरगावमधून प्रतिनिधित्व करणारे बाळासाहेब विखे पाटील नाराज होते.

राष्ट्रवादीकडूनही सहकार्य मिळाले नाही. आता त्यांच्या कुटुंबाकडून विरोधाचा प्रश्नच नाही. संधी मिळाल्यास निवडणूक लढवेल. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारातही वाटा मिळावा, अशी अपेक्षाही आठवले यांनी व्यक्त केली. यावेळी भुपेश थूलकर, राजन वाघमारे, विनोद थूल उपस्थित होते.

Ramdas Athavale
Ramdas Athavale : राज ठाकरे चांगले ॲक्टर, पण मी असल्यामुळे ते भाजपसोबत येणार नाहीत !

राजीनामा देऊन फायदा काय?

ओडिशामधील रेल्वे दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. राजीनामा देऊन फायदा काय होईल? यामुळे मृतांना न्याय मिळू शकणार नाही. या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी केली जाणार आहे. चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी, असे ते म्हणाले.

नव्या संसद भवनाला बाबासाहेबांचे नाव मिळाल्यास आनंद..

नव्या संसद भवनाला नावे देण्यासाठी अनेक सूचना येत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मिळाल्यास आनंदच होईल. संसदेत सेंगोल राजदंडाची स्थापना ही धर्मनिरपेक्षतेवर घाला असल्याचे वाटत नाही, असे ते म्हणाले.

Ramdas Athavale
Ramdas Athawale Photo Story : रामदास आठवलेंची पुन्हा शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा...

शिष्यवृत्तीचा हिस्सा दिला..

केंद्र सरकारकडून शिष्यवृत्तीसाठी ६० टक्के हिस्सा राज्याला दिला होता. हा संपूर्ण हिस्सा केंद्राने राज्याला दिला असून निधी थकित नसल्याचा खुलासा आठवले यांनी केला.

आयोगाने बोलावल्यास फडणवीस जातील..

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची आयोगामार्फत चौकशी करण्याची मागणी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली. फडणवीस यांना बोलवण्याचा अधिकार आयोगाला आहे. त्यांनी बोलावल्यास फडणवीस जातील, असे रामदास आठवले (Ramdas Athavale) म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com