Babanrao Dhakane Passed Away : माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे निधन

Babanrao Dhakane Death : उद्या (शनिवारी) दुपारी एक वाजेपर्यंत पाथर्डीतील हिंद वसतिगृह येथे त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
Babanrao Dhakane
Babanrao DhakaneSarkarnama
Published on
Updated on

प्रदीप पेंढारे

Babanrao Dhakane Died : पाथर्डी तालुक्यातील अकोले गावातील रहिवासी असलेले माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे (वय 85) शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस वकील प्रतापराव ढाकणे हे त्यांचे पुत्र होत.

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. नगरमधील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या (शनिवारी) दुपारी एक वाजेपर्यंत पाथर्डीतील हिंद वसतिगृह येथे त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

पाथर्डीतील पागोरी पिंपळगाव येथे त्यांच्या पार्थिवावर दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती प्रतापराव ढाकणे यांनी समाज माध्यमांवर पोस्ट शेअर करत दिली आहे. महाराष्ट्रातील बीड लोकसभा मतदारसंघातून जनता दलातर्फे नवव्या लोकसभेवर निवडून गेले होते. गोवा मुक्तिसंग्रामात त्यांनी भाग घेतला होता. चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये ऊर्जामंत्री होते.

बबनरावांचा जन्म 10 नोव्हेंबर 1937 अकोले (ता. पाथर्डी) या गावी झाला. जिल्हा लोकल बोर्डामार्फत चालविल्या जाणाऱ्या प्राथमिक शाळेत बबनरावांचे चौथीपर्यंतचे शिक्षण अकोले येथे माध्यमिक शिक्षण आठवीपर्यंतचे तिलोक जैन शाळेत झाले.

Babanrao Dhakane
Maratha Reservation: मराठा आंदोलनाचे राजकीय पडसाद; ग्रामपंचायत सदस्यांचे राजीनामा सत्र सुरूच

पंडित नेहरूंची भेट घेतली...

साने गुरुजी, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माधराव निर्हाळी यांच्या विचारांचा बबनराव यांच्यावर प्रभाव होता. फेब्रुवारी 1951 मध्ये वयाच्या 14 वर्षी दिल्ली येथे जाऊन पंडित नेहरूंची भेट घेतली. त्यांच्याजवळ अन्यायाचे कथन केले.

पंडित नेहरूंनी दखल घेत तत्कालीन अर्थमंत्री सी. डी. देशमुख व वीज मंत्री काकासाहेब गाडगीळ यांच्याकडे पाठवून कार्यवाही करून घेतली. काकासाहेब गाडगीळ यांनी पुणे येथे शिक्षणाची व्यवस्था केली.

गोवामुक्ती संग्रामात सहभागी...

बबनराव यांनी 1 जानेवारी 1952 देशातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत पाथर्डी विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार माधवराव नि-हाळी यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. 14 ऑक्टोबर 1955 रोजी वयाच्या 17 वर्षी बबनराव यांनी गोवामुक्ती संग्रामात सहभागी झाले.

'गणराज्य' या वृत्तपत्राची सुरुवात

25 मे 1957 रोजी त्रिभुवनवाडी (ता. पाथर्डी) येथील सामान्य शेतकरी उत्तमराव कारखेले यांची कन्या सुमन यांच्याशी विवाह झाला. 1969 मध्ये पावडीत विविध व्यवसाय केले. 15 ऑगस्ट 1965 रोजी त्यांनी साप्ताहिक 'गणराज्य' या वृत्तपत्राची सुरुवात केली.

यातून बबनरावांना अहमदनगर जिल्हा पत्रकार संघाच्या सरचिटणीसपदी काम करण्याची संधी मिळाली. 15 ऑगस्ट 1969 रोजी बबनरावांनी ज्ञानेश्वर मुद्रणालय चालू केले. बबनराव यांना तीन अपत्ये होती. त्यातील राजकुमार, शोभा यांचे निधन झाले आहे.

  • विधानसभा सदस्य : पाथर्डी विधानसभा मतदारसंघ (१९७८ ते १९८०)

  • राज्यमंत्री : सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र राज्य (१९७८ ते १९७९)

  • कॅबिनेट मंत्री ग्रामविकास, महाराष्ट्र राज्य (१९७९ ते १९८०)

  • प्रदेशाध्यक्ष : जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेश (१९७९ ते १९८१)

  • विधानसभा सदस्य : पाथर्डी विधानसभा मतदारसंघ (१९८० ते १९८५)

  • विधान मंडळ जनता पक्ष गटनेता : महाराष्ट्र विधानसभा (१९८० ते १९८१)

  • विरोधी पक्षनेता : महाराष्ट्र विधानसभा (१९८१ ते १९८२)

  • विधानसभा सदस्य : पाथर्डी विधानसभा मतदारसंघ (१९८५ ते १९९०)

  • उपाध्यक्ष : महाराष्ट्र विधानसभा (१९८८ ते १९८९)

  • लोकसभा सदस्य : बीड लोकसभा मतदारसंघ (१९८९ ते १९९१)

  • चेअरमन : लोकसभा सदस्य अनुपस्थिती समिती (१९८९)

  • अध्यक्ष : तालिका लोकसभा सभापती (१९८९)

  • केंद्रीय राज्यमंत्री वीज व कोळसा, भारत सरकार (१९९० ते १९९१ )

  • विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य (१९९४ ते २००१)

  • कॅबिनेट मंत्री : पशुसंवर्धन व दुग्धविकास, महाराष्ट्र राज्य (१९९४ ते १९९५) * संस्थापक विश्वस्त : एकलव्य शिक्षण संस्था, पाथर्डी (१९७७)

  • संस्थापक : श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखाना लि., सुमननगर (१९८०)

  • संस्थापक : महाराष्ट्र राज्य ऊसतोड वाहतूक कामगार व मुकादम संघटना (१९८५)

  • संस्थापक : शेतकरी विचार दल (राजकीय पक्ष) (२००१)

  • अध्यक्ष : एकलव्य शिक्षण संस्था, पाथर्डी

  • आजीव सदस्य : कॉमन वेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन, दिल्ली (१९९०)

  • सदस्य : जिल्हा परिषद, अहमदनगर, टाकळी मानूर गट (१९६७ ते १९७२)

  • प्रदेश काँग्रेस कमिटी, महाराष्ट्र राज्य (१९६७)

  • जिल्हा परिषद, अहमदनगर टाकळी मानूर गट (१९७२ ते १९७७)

  • सभापती : पंचायत समिती, पाथर्डी तालुका (१९७२ ते १९७५) * पंचायतराज समिती : महाराष्ट्र विधिमंडळ (१९७८ ते १९७९)

  • महाराष्ट्र राज्य : पीक पैसेवारी पुनर्रचना समिती (१९८४ ते १९८५)

  • महाराष्ट्र राज्य विधिमंडळ कॅपिटेशन फी चिकित्सा समिती (१९८७ ते १९८८)

  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, व्यवस्थापन समिती (१९८७ ते १९८८)

  • अध्यक्ष : महाराष्ट्र विधिमंडळ, आमदार निवास सुधारणा व व्यवस्थापन समिती ( १९७८ ते १९७९)

  • प्रकाशन : साप्ताहिक 'गणराज्य' (१९६५)

  • पुरस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 'जीवन साधना गौरव' पुरस्काराने सन्मानित (२०१४)

  • सामाजिक कार्य : स्वातंत्र्यसेनानी शिरूभाऊ लिमये, भाई वैद्य, सुधाताई जोशी, अनुराधा लिमये यांच्या समवेत गोवामुक्ती संग्रामात सहभाग.

Babanrao Dhakane
Maratha Aarakshan : नगरमध्ये 36 गावांमध्ये नेत्यांना 'नो एन्ट्री'; सदावर्ते यांचा पुतळा जाळला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com