Ajit Pawar : अजितदादांचा भाजपलाच झटका; जिल्हा परिषदेचा माजी उपाध्यक्षच फोडला, साताऱ्यात राजकीय घडामोडींना वेग
महायुतीत फोडाफोडीचे राजकारण तेजीत:
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील नेते एकमेकांचे कार्यकर्ते फोडण्यात गुंतले आहेत, तर महाविकास आघाडी शांत दिसत आहे.विक्रमबाबा पाटणकरांचा राष्ट्रवादीत प्रवेश:
भाजपचे सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.पाटण तालुक्यात राजकीय समीकरणात बदल:
पाटणकरांच्या प्रवेशामुळे पाटण तालुक्यातील भाजपला मोठा धक्का बसला असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रंगत वाढण्याची शक्यता आहे.
Satara, 16 October : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे. त्या तुलनेत महाविकास आघाडीत शांतता असून आघाडीचे नेतेमंडळी हे मतदारयादी आणि मतदान यंत्रातील गैरव्यवहारावर जोर देताना दिसत आहेत. मात्र, महायुतीचे नेते हे निवडणुकीच्या दृष्टीने एकमेकांचे नेते फोडण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.
भारतीय जनता पक्षाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माजी नगरसेवक फोडले, तर शिंदेंनी काँग्रेस नेत्याला गळाला लावले. यात मागे राहतील ते उपमुख्यमंत्री अजित पवार कसले. त्यांनी थेट भाजपवरच प्रहार केला. पाटण तालुक्यातील भाजप नेते आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनाच राष्ट्रवादीत प्रवेश दिला आहे. त्यामुळे साताऱ्यात फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे.
सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर (Vikrambaba Patankar) यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सत्यजितसिंह पाटणकरांच्या भाजप प्रवेशानंतर विक्रमबाबा पाटणकरांनी अखेर भाजपला रामराम करत मुंबईत राष्ट्रवादीचे घड्याळ पुन्हा मनगटावर बांधले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीत पाटणमध्ये रंगत वाढणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात विक्रमबाबा पाटणकरांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यावे ळी मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, आमदार प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादीचे सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
विक्रमबाबा पाटणकरांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशाने पाटण तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.
विक्रमबाबा पाटणकर हे तालुक्यातील जुन्या कार्यकर्त्यांपैकी एक आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते भाजपच्या माध्यमातून स्थानिक राजकारणात सक्रिय होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.