

Solapur, 08 February : सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे यांचा भारतीय जनता पक्षाचे इंद्रजित पवार यांनी तब्बल ४९६१ मतांनी पराभव केला.साठे यांना ७८७५ एवढी, तर इंद्रजित पवार यांना १२८३६ इतकी मते मिळाली आहेत. या पराभावामुळे सोलापूर जिल्हा परिषदेत अनेक वर्षांनंतर साठे नसणार आहेत.
पोस्टल मतांमध्ये इंद्रजित पवार यांना ६५६, तर साठे यांना अवघी १६१ मते पडली होती, त्यामुळे पवार यांनी पोस्टमधूनच आघाडी घेतली होती. त्यानंतर ईव्हीएममधील मतमोजणीत पहिल्या फेरीत इंद्रजीत पवार यांना ६१८२, तर साठे यांना २९२५ मते मिळाली. दुसऱ्या फेरीत पवार यांना ५०९२ एवढी तर साठे यांना ३९८६ एवढी मते मिळाली आहेत.
तिसऱ्या फेरी काका साठे यांना. ९५७ इतकी, तर इंद्रजीत पवार यांना १५५६ .एवढी मतं मिळालेली आहेत. त्यामुळे इंद्रजीत पवार यांनी तब्बल ४९६१ इतक्या मतांनी बळीराम काका साठे यांचा पराभव केला आहे.
साठे यांचा नान्नज-मोहिते जिल्हा परिषद गट हा ओबीसीसाठी आरक्षित झाला होता, त्यामुळे त्यांनी शेजारच्या बी बी दारफळ गटातून निवडणूक लढवली होती. त्यामुळे ही निवडणूक सोपी नव्हती. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी प्रचार न करता गाठभेटींवर भर दिला होता. मात्र त्याचा तितकासा फायदा त्यांना झालेला दिसत नाही.
उत्तर सोलापूर तालुक्यात नान्नज गटातून भाजपच्या चैत्राली मुळे विजयी झाल्या आहेत. करमाळ्यात भाजपच्या रश्मी बागल विजयी झाल्या आहेत. करकंब गटात भाजपचे आदिनाथ देशमुख १११६ मतांनी विजयी झाले आहेत. माढा तालुक्यातून भाजपाचे पृथ्वीराज सावंत हे मानेगावातून विजयी झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.