Prashant Paricharak : भाजप उमेदवारीसाठी भालके मुख्यमंत्र्यांपासून गोरे , महाडिक, आवताडे अन्‌ मलाही भेटल्या : प्रशांत परिचारकांचा गौप्यस्फोट

Pandharpur Nagar Parishad Election 2025 : माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी उघड केले की प्रणिता भालके भाजपची उमेदवारी मिळावी म्हणून चार तास वाट पाहत होत्या व फडणवीस, गोरे, आवताडे, महाडिक यांची भेट घेतली.
Prashant Paricharak =
Pranitha Bhalke
Prashant Paricharak = Pranitha BhalkeSarkarnama
Published on
Updated on

पंढरपूर नगरपरिषदेत भाजपची उमेदवारी मिळावी म्हणून प्रणिता भालके यांनी माजी आमदार प्रशांत परिचारकांसह भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना भेटल्याचा परिचारकांचा दावा.
देवेंद्र फडणवीस, जयकुमार गोरे, समाधान आवताडे, धनंजय महाडिक यांच्यासोबत झालेल्या भेटींचा उल्लेख करत उमेदवारीसाठी भालके यांनी अनेक प्रयत्न केल्याचे उघड.
परिचारकांचा आरोप—नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी प्रणिता भालके चार तास माझी वाट बघून बसल्या होत्या.

Pandharpur, 25 November : पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळावी; म्हणून प्रणिता भालके ह्या माझी चार तास वाट पाहत बसल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, खासदार धनंजय महाडिक या सर्वांना भेटल्या, असा गौप्यस्फोट पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केला.

पंढरपूर (Pandharpur) नगरपरिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून श्यामल शिरसाट नगराध्यक्षपदासाठी लढत आहेत, त्यांना माजी आमदार (स्व.) भारत भालके यांच्या सूनबाई आणि भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणिता भालके यांनी आव्हान दिले आहे. दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रचार आणि आव्हान-प्रतिआव्हान दिलं जात आहे.

दरम्यान, माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांनी भाजपच्या एका प्रचार सभेत बोलताना प्रणिता भालके यांच्या उमेदवारीबाबत गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले, प्रणिता भालके ह्या माझ्याकडे आल्या होत्या. मला तुमच्या पक्षात घ्या आणि उमेदवारी द्या, अशी विनंती त्यांनी माझ्याकडे केली होती. त्या वेळी ‘माझ्या हातात काही नाही, तुम्ही पक्षाकडं जावा, असं मी त्यांना म्हटलं होतं.

माझ्यानंतर भालके यांनी आमदार समाधान आवताडे यांच्याकडे गेल्या, त्यांच्याकडेही पंढरपूर नगरपरिषदेच्या उमेदवारीची मागणी प्रणिता भालके यांनी केली. आवताडेंनीही ‘माझ्या हातात काही नाही, तुम्ही पक्षाकडं जावा,’ असं भालकेंना सांगितलं. आवताडेंनीही पक्षश्रेष्ठींना भेटण्याचा सल्ला त्यांना दिला हेाता.

Prashant Paricharak =
Pranitha Bhalke
Yashwantrao Chavan : यशवंतराव चव्हाण यांचा प्रशासनाला विसर? सुप्रिया सुळे थेट CM फडणवीसांना पत्र लिहिणार

आमदार आवताडेंच्या भेटीनंतर प्रणिता भालके ह्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे गेल्या. ‘आम्ही भारतीय जनता पक्षात येतो, आम्हाला उमेदवारी द्या,’ अशी मागणी भालकेंनी त्यांच्याकडे केली होती. पण, पालकमंत्री गोरे यांनीही माझ्याकडे काही नाही, तुम्ही मुंबईला वरिष्ठांकडं जावा, असे सांगितले. गोरे यांच्यानंतर भालके हे खासदार धनंजय महाडिक यांना घेऊन मुंबईला गेल्या. मुंबईत गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्या. मुख्यमंत्र्यांना त्या म्हणाल्या, आम्ही तुमच्याबरोबर येतो, आम्हाला उमेदवारी द्यावी, अशी विनंती केली.

Prashant Paricharak =
Pranitha Bhalke
Solapur Congress : प्रणिती शिंदेंनी सोलापूर ग्रामीणमध्ये काँग्रेसला वाऱ्यावर सोडलं? निवडणुकीपूर्वीच पक्ष बॅकफुटवर

त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘तुम्ही पंढरपूरला जावा अणि परिचारक मालकांना भेटा,’ असे सांगितले. मी यात काहीच बोलत नाही. अभ्यंकर वकिल इथं समोर आहेत. ते तुम्हाला सांगतील. पंढपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळावी, यासाठी प्रणिता भालके ह्या चार तास माझी वाट पाहत थांबल्या होत्या, असा दावाही परिचारक यांनी केला.

प्र.1: प्रशांत परिचारकांनी कोणता आरोप केला?
उ: प्रणिता भालके भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी चार तास त्यांची वाट पाहून बसल्या होत्या, असा दावा त्यांनी केला.

प्र.2: प्रणिता भालके कोणकोणत्या नेत्यांना भेटल्या?
उ: देवेंद्र फडणवीस, जयकुमार गोरे, समाधान आवताडे आणि धनंजय महाडिक यांना.

प्र.3: भालके यांची मागणी नेमकी काय होती?
उ: पंढरपूर नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून उमेदवारी मिळावी, अशी त्यांची विनंती होती.

प्र.4: मुख्यमंत्री फडणवीसांनी भालकेंना काय सांगितले?
उ: पंढरपूरला जाऊन परिचारकांना भेटा, असा सल्ला दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com