Ahmednagar Politics : 'श्रीगणेश'वरून विखे विरुद्ध थोरात-कोल्हेंची खडाखडी पोचली आजी-माजी चेअरमनपर्यंत...

Ganesh Sugar Factory News : "भ्रष्ट कारभार गेल्या दहा वर्षांत झाला आहे, त्याचा भांडाफोड करण्यासाठी साक्षीदार व्हा..."
Ahmednagar News :
Ahmednagar News :Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : राहाता तालुक्यातील श्रीगणेश साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने विखे विरुद्ध थोरात-कोल्हे वाद निवडणुकीनंतर श्रीगणेश कारखान्याच्या आजी-माजी चेअरमन आणि पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहाेचला आहे. विखे गटाचे माजी चेअरमन मुकुंदराव सदाफळ यांनी 'श्रीगणेश'साठी जिल्हा बँकेकडून मिळणाऱ्या कर्जात विखे काटे टाकून अडथळे आणत असल्याच्या केलेल्या आरोपांना थोरात-कोल्हेंनी कारखाना चालवून दाखवावा, असे प्रत्युत्तर दिले होते. त्याला आता थोरात-कोल्हे यांच्या गटाचे विद्यमान चेअरमन सुधीर लहारे यांनीही सडेतोड उत्तर दिले आहे. (Latest Marathi News)

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

Ahmednagar News :
Narendra Modi Dinner News : G20 साठी राबणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत पंतप्रधान मोदी करणार डिनर; तब्बल ३ हजार...

सदाफळ यांनी लक्षात घेतले पाहिजे की, कोणताही साखर कारखाना वित्तीय संस्थांच्या सहकार्याने चालतो, गणेश चालवायला घेतला तेव्हा ही प्रवरा कारखान्याने गणेश कारखाना गहाण ठेवून कर्ज काढलेले होते, याची कदाचित माजी अध्यक्षांना कल्पना नसेल. आज शासनाच्या सहकार खात्याच्या यंत्रणेला खोटे नाटे पत्र देऊन गणेश सहकारी साखर कारखान्याला वित्तीय पुरवठा होऊ नये, यासाठी मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण केले जात आहेत, असा आरोप प्रसिद्धिपत्रकाद्वारे केला आहे.

गणेश कारखान्याच्या संचालक मंडळाने मांडलेली भूमिका ही व्यक्तिगत विरोधातून नाही, तर कामगार आणि सभासदांचे प्रपंच फुलावे यासाठी आहे. राहिला प्रश्न ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि युवा नेते विवेक कोल्हे यांच्या सहकार्याचा, त्यांच्याच सहकार्यातून गणेश कारखान्यात परिवर्तन घडले आणि त्यांच्याच सहकार्यातून गणेश कारखान्याची पुढची वाटचालसुद्धा चांगली सुरू आहे, असा विश्वास व्यक्त करत एकप्रकारे विखेंना टोला लगावला आहे.

Ahmednagar News :
NCP Political Crisis: शरद पवारांचा आणखी एक साथीदार सोडणार साथ; 'या' दोन खासदारांची नावे चर्चेत

जुन्या संचालकांनी लक्ष दिले असते, रेकॉर्ड तपासून घेतले असते, तर आज ज्या खोट्या नाट्या रकमा गणेश कारखान्याच्या नावे लावून गणेश कारखान्याला हडपण्याचा प्रवरेचा जो डाव सुरू आहे तो झाला नसता. तत्कालीन संचालक मंडळाला आम्ही आवाहन करतो की, आपण दहशत झुगारून गणेश सहकारी साखर कारखान्याच्या चांगल्या भविष्यासाठी पाठीशी उभे राहा. जो भ्रष्ट कारभार गेल्या दहा वर्षांत झाला आहे, त्याचा भांडाफोड करण्यासाठी साक्षीदार व्हा, असे आवाहन केले आहे.

Edited By - Chetan Zadpe

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com