मुळा व निळवंडेच्या उपसा सिंचन सर्वेक्षणाला गडाखांची रसद : 2 कोटी 37 लाखांचा निधीची तरतूद

मुळा व निळवंडे धरणातून जलसिंचन वाढविण्यासाठी राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) यांनी जलसंधारण मंत्रालयामार्फत मोठा निधी आणण्यास सुरवात केली आहे.
Shankarrao Gadakh
Shankarrao GadakhSarkarnama
Published on
Updated on

सोनई (जि. अहमदनगर) - अहमदनगर जिल्ह्यासाठी मुळा व निळवंडे धरणातून जलसिंचन वाढविण्यासाठी राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) यांनी जलसंधारण मंत्रालयामार्फत मोठा निधी आणण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अधिक समृद्ध होण्यास मदत होणार आहे. ( Gadakh provides funds for upsa irrigation survey of radish and nilwande: Provision of Rs. 2 crore 37 lakhs )

या संदर्भात मंत्री शंकरराव गडाख यांनी माहिती दिली. ते म्हणाले, हजारो शेतकऱ्यांच्या शेतीला जीवनदायिनी असलेल्या मुळा व निळवंडे धरणाच्या सतरा कालव्याचे सर्वेक्षण करण्यासाठी दोन कोटी 37 लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

Shankarrao Gadakh
शंकरराव गडाख म्हणाले, हा हल्ला म्हणजे मला राजकारणातून संपविण्याचा कट

ते पुढे म्हणाले की, मुळा धरणाच्या जलाशय व नदीवर तर निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावरील एकुण सतरा योजनांसाठी ही तरतूद आहे. 101 ते 600 हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या सतरा योजनांसाठी एकूण 3 हजार 900 हेक्टरचे सर्वेक्षण करण्यासाठी 2 कोटी 37 लाख 31 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. उपसा सिंचन योजनांच्या कामासाठी निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी होत होती, असे त्यांनी सांगितले.

उपसा सिंचन योजनांची क्षेत्रीय प्राथमिक पाहणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील शिंदोडी, मांडवे, बिरेवाडी, खरशिंदे, साकुर, वरवंडी, पेमगिरी, शिरापूर, डिग्रस, पारेगाव खुर्द व बुद्रुक, तिगाव, काकडवाडी, करुले, क-हे, निमोन, व सोनोशी या 17 गावातील अवर्षण प्रवण क्षेत्राचा समावेश आहे. या भागात उपसा सिंचन झाल्यास पिण्याचा तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

Shankarrao Gadakh
सुजय विखेंचा जवळचा कार्यकर्ता शंकरराव गडाख, औटी यांनी फोडला...

यामध्ये 251 ते 600 हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या 1800 हेक्टरचे सर्वेक्षण करण्यासाठी 96 लाख 98 हजार 141 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर 101 ते 250 हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या 2100 हेक्टरचे सर्वेक्षण करण्यासाठी 1 कोटी 40 लाख 33 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सर्वेक्षणानंतर प्रामुख्याने नलिका प्रणालीचे सखोल संकल्पन केल्यानंतर अहवाल सादर करण्यात येईल. याशिवाय नदीपात्र, नदीकाठ ते जॅक वेल तसेच संपूर्ण नलिका वितरणाचे तलांक नकाशावर दर्शविण्यात येतील, असेही मंत्री गडाख यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com