
Ahmednagar News : राहता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीनिमित्त महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात आमने-सामने ठाकले आहेत. त्यांच्यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपाने अहमदनगर जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघत आहे.
दरम्यान, गणेश साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली असतानाही हा कारखाना पाच वर्षे कराराने विखे पाटलांच्या प्रवारा कारखान्याला चालवायला दिला आहे. हा करार धमाकावून झाल्याचा धक्कादायक आरोप आता करण्यात आला आहे.
थोरात-कोल्हे गटाच्या पॅनलच्या प्रचार शुभारंभ शुक्रवारी (ता. ९) वाकडी येथील खंडोब मंदिरात पार पडला. यावेळी थोरतांनी विखे पाटलांचा कडक शब्दात समाचार घेतला. त्याचवेळी कारखान्याचे माजी अध्यक्ष नारायण कार्ले यांनी विखे पाटलांवर गंभीर आरोप केला आहे. निवडणूक लागली असताना धमकावून, अडवणूक करून हा कारखाना चालवण्यासाठी प्रवाराच्या नेत्यांनी करार केल्याचा खळबळजनक दावा केला आहे. (Latest Marathi News)
गणेश सहकारी साखर कारखान्याचे (Ganesh Sugar Factory) माजी अध्यक्ष नारायण कार्ले म्हणाले, "गणेश कारखाना हा आम्हाला धमकावून 'प्रवरे'च्या नेतृत्वाने बळकावलेला आहे. गणेश कारखाना चालू नये अशी 'प्रवरे'च्या नेतृत्वाची इच्छा होती. त्यासाठी सर्व बाजूने त्यांनी गणेशच्या संचालक मंडळाची नाकेबंदी केली. कोणतीही बँक आम्हाला कर्ज द्यायला तयार नव्हती. कारखान्याचे खोटे ऑडिट केले. त्या ऑडिटच्या माध्यमातून संचालक मंडळाला तुरुंगात घालण्याच्या धमक्या दिल्या. त्यातूनच आम्हाला करार करायला भाग पाडले. आमच्या कारकिर्दीत आम्ही 22 लाख टनाचं गाळप केले हे टीका करणाऱ्यांनी विसरू नये."
दरम्यान, आपल्या पॅनलच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमात राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil) यांनी थोरांतवर बोचरी टीका केली होती. ते म्हणाले होते, " या कारखान्याच्या निवडणुकीनिमित्त आलेल्या पाहुण्यांचा डोळा फक्त या भागातील उसावर आहे. आम्हालाही पाहुणचाराला अनेकांच्या तालुक्यात जावे लागेल." त्यानंतर थोरांत यांनीही विखेंवर पलटवार केला आहे.
बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले, "मी याच तालुक्यातील मतदार आहे. तुम्ही जिल्हाभर हुंदडता अन् मला पाहुणे कलाकार म्हणता. तसे म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही. सभासदांच्या आग्रहाखातर आम्ही येथे आलो. गणेश कारखान्याची आठ वर्षात यांनी काय अवस्था करून ठेवली आहे, हे सर्वज्ञात आहे. कोणत्याही गोष्टींचा हिशेब नाही. हा कारखाना 'संगमनेर' आणि 'संजीवनी' सारखाच चालवणार. आम्ही या परिसरामध्ये पुन्हा एकदा गणेशचे धुराडे पूर्ण क्षमतेने पेटावे, सभासदांचा सन्मान राखावा यासाठी एकत्र आलो आहोत."
(Edited by Sunil Dhumal)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.