Phaltan News : पालखी सोहळ्यात कसलीही गैरसोय नको : मंत्री रवींद्र चव्हाण

Ravindra Chavan सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांनी आज फलटण येथे पालखी तळाची पाहणी केली.
Ravindra Chavan, Jaykumar Gore
Ravindra Chavan, Jaykumar GoreSarkarnama

-किरण बोळे

Phaltan News : श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा फलटण मुक्कामी असताना सोहळ्यातील वारकरी, दिंडीकरी तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कसलीही गैरसोय होऊ नये, याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी. यासोबतच वारकऱ्यांसाठी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाने भर द्यावा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण Ravindra Chavan यांनी आज फलटण येथे पालखी तळाची पाहणी केली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष, आमदार जयकुमार गोरे Jaykumar Gore, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, मुख्याधिकारी संजय गायकवाड, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक-निंबाळकर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

फलटणचा पालखी तळ प्रशस्त असल्याने या ठिकाणी मानाच्या सर्व दिंड्या एकाच ठिकाणी बसत असून, या ठिकाणी कोणतीही अडचण येणार नाही. याची खबरदारी प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. यासोबतच नोंदणी नसलेल्या दिंड्यांचीही विशेष व्यवस्था करावी, असे श्री. चव्हाण यांनी सांगितले.

Ravindra Chavan, Jaykumar Gore
Phaltan News : माढ्यात भाजपच्या निंबाळकरांविरोधात राष्ट्रवादीकडून 'राम'अस्त्र

जिल्ह्यातील इतर पालखी तळांच्या तुलनेत फलटणचा पालखी तळ भव्यदिव्य असून, येथे पालखी सोहळ्याच्या सर्व बाबींचे योग्यरीत्या नियोजन केले जाते. श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा समिती व प्रशासनाच्या माध्यमातून फलटण पालखी तळावर कोणतीही कमतरता भासू देणार नाही, याची ग्वाही प्रांताधिकारी डॉ. जगताप यांनी दिली. या वेळी फलटणसह तरडगाव व बरड पालखी तळाचा आढावा मंत्री चव्हाण यांनी घेतला.

Ravindra Chavan, Jaykumar Gore
Satara News : महाबळेश्वर, पाचगणीतील अतिक्रमणांबाबत कायदेशीरबाबी तपासूनच निर्णय घेणार : जितेंद्र डुडी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com