Satara News : 'आरएसएस'च्या विचारातूनच समान नागरी कायद्याचा घाट : जयदेव गायकवाड

Jaydev Gaikawad सातारा राष्ट्रवादी काँग्रेस भवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जयदेव गायकवाड बोलत होते.
Jaydev Gaikawad, Narendra Modi
Jaydev Gaikawad, Narendra Modisarkarnama

Satara NCP News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे मुळातच सर्वच समान आहेत, असे असताना आरएसएसच्या विचारातूनच समान नागरी कायदा होऊ घातला आहे. या कायद्याला आमचा विरोध नाही. परंतु ज्या पद्धतीने पुढे आणला जात आहे, त्यावरुन हा कायदा संघाच्या विचारप्रणालीचा एक अजेंडा आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे राज्य प्रमुख व माजी आमदार जयदेव गायकवाड यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस भवनात NCP आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जयदेव गायकवाड Jaydev Gaikawad बोलत होते. यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे, प्रदेशाउपाध्यक्ष पंडित कांबळे आदी उपस्थित होते. सातारा Satara येथे मातंग आघाडीची पश्चिम महाराष्ट्र समाज परिषद येत्या तीन जुलैला दुपारी एक वाजता हाोणार आल्याचे त्यांनी सांगितले.

जयदेव गायकवाड म्हणाले, गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मुस्लिम समाजाला जाणीवपूर्वक विरोध करण्याचा अजेंडा राबवण्यात येतो आहे, त्याचाच परिपाक म्हणजे समान नागरीक कायदा आहे. या कायद्याला आमचा विरोध नाही परंतु ज्या प्रकारे हा कायदा आणला जातो आहे, त्याला विरोध आहे.

Jaydev Gaikawad, Narendra Modi
Devendra Fadanvis यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत सगळंच सांगितलं | BJP | NCP | Sarkarnama Video

डॉ. बाबासाहेबांनी संविधानाने सर्वांना समान वागणूक दिली आहे. समान अधिकार दिले आहेत. त्यामुळे समान नागरिक कायद्याची आता तर गरज नाही. भाजपाकडून जी धोरणे राबवली जात आहेत. ती चुकीची आहेत, असा आरोप त्यांनी केला.

Jaydev Gaikawad, Narendra Modi
Satara News : कांदाटी खोऱ्यातील तरुणांचे स्थलांतर रोखणार... एकनाथ शिंदे

सातारा तालुक्यातील कोंडवे येथील अनंतराज मल्टीपर्पज हॉल येथे पश्चिम महाराष्ट्रातील विभागीय मातंग परिषदेचे आयोजन तीन जुलै रोजी दुपारी एक वाजता करण्यात आले आहे. या मातंग परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार हे मार्गदर्शन करणार आहेत.

त्याचबरोबर खासदार श्रीनिवास पाटील, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक -निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, संजय बनसोडे, दीपक चव्हाण, बसवराज पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटी आदी उपस्थित रहाणार आहेत.

Jaydev Gaikawad, Narendra Modi
Sanjay Raut यांनी Devendra Fadanvis यांना डिवचले, NCPसोबत जाण्याचा प्रयोग फसला | Shivsena | BJP

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com