Gokul Dudh Mahasangh : गोकुळमध्ये भाऊबंदकीचा वाद उफाळला, नेमकं काय आहे प्रकरण?

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात देखील करवीर विधानसभा मतदारसंघातील भाऊबंदकीचा वाद आता गोकुळच्या राजकारणात उफाळून आला आहे. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
Gokul Mahasangh
Gokul MahasanghSarkarnama
Published on
Updated on

राजकारण भाऊबंदकीच्या जीवावर उठते असे अनेक उदाहरण राज्यात नव्हे तर देशभरात आपल्याला ऐकायला मिळाली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात देखील करवीर विधानसभा मतदारसंघातील भाऊबंदकीचा वाद आता गोकुळच्या राजकारणात उफाळून आला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट गोकुळ मधील सत्ताधारी संचालकाने दूध संकलन करणाऱ्या नव्या संस्थेला परवानगी द्यायची नाही अशी तंबीच अधिकाऱ्याला दिली आहे. त्यामुळे सत्तेत असलेल्या दुसऱ्या संचालकाचा बरगळा आहे. हा वाद गोकुळा अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या कोर्टात गेला असून त्यावर दोन दिवसात अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती अध्यक्ष डोंगळे यांनी दिली आहे.

नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. करवीर, पन्हाळा आणि गगनबावडा असलेल्या मतदारसंघात भाऊबंदकीच्या राजकारणामुळे चांगलाच चर्चेत आला होता. एकमेकांच्या विरोधात भाऊबंदकी उतरल्याने त्याची चर्चा जिल्ह्यात सुरू होते. मात्र त्याचा परिणाम आता गोकुळ दूध संघाच्या राजकारणात देखील पाहायला मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीत निकाल काय लागणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलं होतं. मात्र निकाल महायुतीच्या बाजूने लागल्याने त्याचे पडसाद आता गोकुळमध्ये उमटत आहेत. गोकुळ दूध संघात एका गरीब दूध उत्पादक शेतकऱ्याचे दूध संकलन करून घेतले जात नसल्याने नव्या दूध संकलन केंद्राला मंजुरी द्यावी असा प्रस्ताव गोकुळकडे (Gokul Dudh) दिला होता.

Gokul Mahasangh
Ranjitsinh Mohite Patil : रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपतून लवकरच होणार हकालपट्टी; फडणवीसांच्या निकटवर्तीय आमदाराचे स्पष्ट संकेत

मात्र सत्तेत असलेल्या दुसऱ्या संचालकाने अधिकाऱ्यालाच तंबी दिल्याने हा प्रस्ताव रेंगाळला आहे. दोन नेत्यांच्या मतांच्या इर्षेमुळे दूध उत्पादक शेतकऱ्याला वेठीस धरणार का असा सवाल आता गोकुळच्या राजकारणात उमटत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर (Vidhansabha Election) करवीर विधानसभा मतदारसंघातील आडवा आडवीचे राजकारण कमी होईल असे चित्र होते. मात्र या प्रकरणानंतर पुन्हा एकदा आडवा आडवीचे राजकारण सुरू झाले आहे. अशी चर्चा आहे.

Gokul Mahasangh
Sangola Politic's : शहाजीबापूंनी मोठ्या भावाची जबाबदारी पार पाडायला हवी होती; दीपक साळुंखेंनी व्यक्त केली नाराजी

नेमकं प्रकरण काय

कोलिक परिसरातील दूध संस्थेने गोठणे येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे 10 ते 15 लिटर दूध घेणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे या शेतकऱ्याला दुसऱ्या एका संस्थेत तात्पुरते दूध संकलन करण्यास सांगितले. मात्र ती संस्था दूध उत्पादक शेतकऱ्याच्या सोयीची नसल्याने त्याने दुसऱ्या दूध संस्थेला परवानगी द्यावी अशी मागणी गोकुळ दूध संघाकडे केली होती. मात्र सत्तेतीलच एका संचालकाने त्याला तीव्र विरोध केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com