

Kolhapur News: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या बाराशे सभासदांच्या पात्रते संदर्भात सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईतून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी माघार घेतली.
शिवाय तत्कालीन दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या सभासदांच्या पात्रते संदर्भात काढलेला आदेश कोल्हापूर सर्किट बेंचने रद्द केला. त्यामुळे या बाराशे सभासदांची पुन्हा पडताळणी होणार आहे. मात्र गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीला कोणतेही स्थगिती देणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
गोकुळ दूध संघातील बाराशे सभासद संदर्भातील मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच येथे याचिका दाखल करण्यात आली होती. आजरा तालुक्यातील वडकशिवाले येथील प्रकाश बेलवाडे यांनी या बाराशे सभासदांना पात्र करण्यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या तत्कालीन दुग्धविकास मंत्री विखे पाटील यांनी काढलेल्या आदेशाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. मागील सुनावणीत राज्य सरकारला या संदर्भात आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले होते.
आज याची सुनावणी झाली. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) संदर्भातील 1200 संस्थांच्या याचिकेबाबत वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वकिलाकडून माघार घेत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सर्किट बेंचच्या न्यायमूर्तींनी दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयात तत्कालीन दुग्धमंत्री आणि सहाय्यक निबंधक, मुंबई यांनी दिलेले आदेश रद्द ठरवले आहेत. शिवाय गोकुळ दूध संघावरील निवडणुकीची स्थगिती देखील उठवण्यात आली.
बाराशे सभासदांबाबत कोणता निर्णय होणार? त्याला वगळून ही निवडणूक होणार का? याचा निर्णय राज्य सरकार आणि दुग्ध निबंधकांकडे सोपवला आहे. या निर्णयामुळे गोकुळमधील सुमारे 1200 सहकारी संस्थांवर लिक्विडेटर नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लवकरच त्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. शिवाय अनेक संस्थांच्या कारभारावर प्रशासकीय नियंत्रणही येऊ शकते. मात्र या निर्णयानंतर आता गोकुळमध्ये निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा असल्याचे संकेत मिळत आहेत.
मात्र न्यायालयाने निवडणुकीवर स्थगिती न दिल्यामुळे निवडणूक प्रक्रिया पुढे जाऊ शकते. तसेच, प्रशासक नेमणुकीसाठी आणखी एक याचिका दाखल करण्यात आली असून, या प्रकरणात पुढील सुनावणीनंतरच अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.