Kolhapur News : धनंजय महाडिकांचा 'प्लॅन' अजित पवार-मुश्रीफांनी हाणून पाडला; गोकुळमध्ये सतेज पाटलांसोबतची मैत्री कायम राहणार

Kolhapur Politics : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळचे विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांचा कार्यकाळ 25 मे रोजी संपत आहे. पुढील वर्षी गोकुळ दूध संघाची निवडणूक आहे.
Gokul | Satej Patil | Hasan Mushriff | Dhananjay Mahadik
Gokul | Satej Patil | Hasan Mushriff | Dhananjay MahadikSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Politics : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळचे विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांचा कार्यकाळ 25 मे रोजी संपत आहे. पुढील वर्षी गोकुळ दूध संघाची निवडणूक आहे. या काळात गोकुळ दूध संघावर अनुभवी चेहरा हवा त्यासाठी काँग्रेस आमदार सतेज पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून अध्यक्षपदाचे नाव पुढे येणार आहे. पुढील वर्षी होणारी निवडणूक आणि विरोधकांना तोंड देण्यासाठी सक्षम अध्यक्ष देण्यासाठी नेत्यांकडून नावाची शोध मोहीम सुरू आहे.

अशात काही दिवसांपूर्वी गोकुळ दूध संघात सजेत पाटील यांना धक्का देण्यासाठी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून रणनीती आखल्याची माहिती पुढे येत आहे. त्यांनी महायुतीतील नेत्यांची मोट बांधण्याचे काम सुरू केले होते. महायुतीतील नेत्यांना एकत्र करत गोकुळ मध्ये सत्तांतर घडवण्याचा डाव महाडिक गटाचा आहे. मात्र त्यांच्या हा मनसुबा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उधळून लावला आहे.

Gokul | Satej Patil | Hasan Mushriff | Dhananjay Mahadik
Satej Patil News : 'सत्ताधारी विरोधी पक्षाला इतके का घाबरतात ?', सतेज पाटलांचा थेट सवाल

अध्यक्ष निवडीतच आमदार सतेज पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून झाला. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, डॉ. विनय कोरे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. फडणवीस यांनी त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार व मुश्रीफ यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत ‘गोकुळ’मध्ये पाटील यांना बाजू ठेवल्यास जिल्हा बँकेसह अन्य सहकारी संस्थांमध्ये सतेज पाटील वेगळी भूमिका घेऊ शकतील, असा मुद्दा पवार यांनी मांडला.

Gokul | Satej Patil | Hasan Mushriff | Dhananjay Mahadik
Shivsena Vs Congress : कोल्हापुरात काँग्रेस फुटणार? बंटी पाटलांचे शिलेदार शिंदे सेनेच्या वाटेवर, पण......

याबाबतची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरही मांडण्यात आली. त्यामुळे सहकारात सध्या जे सुरू आहे ते तसेच राहावे, यावर सर्व नेत्यांचे ठाम मत झाल्याचे समजते. मात्र पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीला महायुती मधील अनेक मातब्बर एकत्र येण्याची शक्यता आहे. यात आता वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ काय भूमिका घेतात याकडे लक्ष आहे. सध्या तरी त्यांनी आमदार सतेज पाटील यांच्या सोबत राहण्याचा निर्णय गोकुळमध्ये घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com