Gokul: गोकुळ निवडणुकीत भाजपचा 'नवा डाव' : थेट ४१० संस्था मतदानासाठी अपात्र करण्याचे आदेश; सत्ताधारी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

Gokul Milk Union, Kolhapur News, Gokul Election: गोकुळ दूध संघ निवडणुकीत ४१० दूध संस्था मतदानासाठी अपात्र ठरवल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. संबंधित संस्था न्यायालयात जाण्याच्या तयारीत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
BJP changes equation in Gokul election
GokulSarkarnama
Published on
Updated on

Gokul Milk Union: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने अंतिम मतदार यादी करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असताना पुणे विभागीय दुग्ध निबंधक राजकुमार पाटील यांनी ४१० दूध संस्था मतदानासाठी अपात्र करण्याचे आदेश गोकुळ सह दुग्ध निबंधक कोल्हापूर यांना दिले आहेत. त्यामुळे भाजप वगळता सर्वपक्षीय नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. विभागीय निबंधकांच्या या आदेशामुळे सर्वांनाच धक्का बसला असल्याने या संस्थेच्या न्यायासाठी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, जनसुराज्य शक्ती पक्षाचे संचालक भेट घेऊन या संस्थेंबाबत योग्य निर्णय घेण्याची विनंती करणार आहेत.

BJP changes equation in Gokul election
Gokul Milk News: ना चौकशी, ना नोटीस; गोकुळच्या 427 संस्थांना अपात्र ठरवल्याने संताप, संस्था चालक न्यायालयात जाणार

विभागीय उपनिबंधक (दुग्ध) यांनी चौकशी समितीच्या अहवालानुसार ४१० दूध संस्थांचे सभासदत्व रद्द करण्याचे आदेश 'गोकुळ'च्या प्रशासकीय मंडळाला दिले आहेत.त्याचबरोबर या संस्थांना मतदार यादीतून वगळण्याचे आदेशही त्यांनी प्राधिकृत अधिकाऱ्यांना दिले आहेत. आज बुधवार ठराव दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने ठरावाचा अंतिम आकडा समोर येणार आहे. ठराव दाखल केलेल्या संस्थांमध्ये या ४१० संस्थांचे ठराव दाखल असतील तर या ठरावाच्या प्रक्रियेतून या संस्थांना वगळण्यात येणार आहे.

बुधवारी ( ता. १) ठराव दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबधित संस्थांना वगळून प्रारुप यादीचे काम सुरु केले जाणार असल्याचे समजते. ४१० संस्थेचे सभासद व मतदानासाठी रद्द ठरवण्यात आले असल्याचे आदेश देण्यात असले तरी गोकुळ दूध संघाकडून मिळणाऱ्या सेवा आणि सुविधा चालूच राहणार आहेत. आज झालेल्या प्रशासकीय मंडळात या संस्थांबाबत कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही.

BJP changes equation in Gokul election
Gokul Milk Union Politics: गोकुळच्या राजकारणात नवा ट्विस्ट! अरुण डोंगळे, सतेज पाटलांचं ठरलं; अपात्र संस्थेवरून घेतला निर्णय

पुन्हा न्यायालयाची पायरी चढण्याचा इशारा

यापूर्वी आवसायानातील अनेक दूध संस्था अपात्र झाल्या आहेत. त्यासंदर्भात या दूध संस्था न्यायालयात गेल्या आहेत. आज शंभरहून अधिक दूध संस्थांनी कोल्हापूर सर्किट बेंच येथे याचिका दाखल केली. या याचिकेच्या सुनावणीवेळी जवळपास ११६ हुन अधिक दूध संस्थांना अपात्रतेचा आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. या संदर्भात अंतिम सुनावणी आठ जुलै रोजी होणार आहे. तर ४१० संस्था मतदानास अपात्र केल्यानंतर विभागीय दुग्ध निबंधकांच्या आदेशाला न्यायालयात देखील आव्हान देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com