

Kolhapur News: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघातील अखेर अवसायानात निघालेल्या 1320 दूध संस्थांपैकी 644 दूध संस्था या अपात्र ठरल्या. गेल्या दीड महिन्यांपासून सत्ताधारी संचालक मंडळाच्या विरोधात विविध तक्रारी झाल्याने गोकुळ दूध संघाचे राजकारण उफाळून आले होते.
संस्था अपात्र झाल्यानंतर महायुतीतीलच घटक पक्षाच्या नेत्यांना धक्का बसला आहे. मात्र या सर्व घडामोडीनंतर ही गोकुळ दूध संघाची निवडणूक पुन्हा एकदा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. अपात्र झालेल्या संस्थेंना न्याय देण्यासाठी अनेक जण न्यायालयाची पायरी चढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोकुळ दूध संघाची निवडणूक पुन्हा एकदा न्यायालयीन प्रक्रियेत अडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
2023 च्या आकडेवारीनुसार गोकुळ दूध संघाकडून 5470 इतक्या दूध संस्था मतदानाला पात्र असल्याचे सांगण्यात आले होते. त्याला न्यायालयीन आणि दुग्ध निबंधक विभागाकडे आव्हान दिल्यानंतर त्यातील ४८४४ दूध संस्था मतदानासाठी पात्र ठरल्या आहेत. दरम्यान तत्कालीन दुग्ध निबंधक सुजय कदम यांच्याकडून 267 दूध संस्था पात्र ठरविण्यात आल्या होत्या. त्याला देखील आता आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे त्याचा निकाल देखील प्रलंबित आहे. त्यातील काही संस्था अपात्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, ज्या संस्था अपात्र झाल्या आहेत. त्या संदर्भात माजी संचालकांनी बैठक घेत न्यायालयीन लढाई लढण्याची सहमती दर्शवली आहे. शिवाय सहकार विभागाकडे न्याय मागण्याची भूमिका ठेवली आहे. जोपर्यंत यासंदर्भात निकाल येत नाही. तोपर्यंत निवडणूक न घेण्याची विनंती देखील यामध्ये करणार आहेत. दरम्यान, जोपर्यंत महाडिक आणि मुश्रीफ गटात वाद आहे. आणि या गटातून जितकी गोकुळ दूध संघाची निवडणूक पुढे ढकलता येईल तितका प्रयत्न करण्याची भाजपची खेळी आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जितक्या जास्त कार्यकाळ प्रशासकाचा असेल, तितकी भाजपसाठी पोषक वातावरण असणार आहे.
एका रात्रीत बदली झालेले तत्कालीन दुग्ध निबंधक सुजय कदम यांनी राजकीय दबावापोटी 267 संस्था पात्र केल्या त्या संदर्भात प्रकाश बेलावडे यांनी सहकार विभागाकडे हरकत घेतली आहे. त्यामुळे पुन्हा ही निवडणूक न्यायालयीन प्रक्रियेत अडकण्याची शक्यता आहे. या सर्व राजकीय घोळामुळे जे माजी संचालक नाराज आहेत. त्यांची नाराजी जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत ही निवडणूक पुढे ढकलण्याची रणनीती आखली जात आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे पावसाळ्याच्या तोंडावर ही निवडणूक होणे शक्य नसल्याने काही काळानंतर ती निवडणूक व्हावी अशी मागणी काही नेत्यांची आहे. शिवाय गेल्या पाच वर्षात गोकुळ मध्ये जे व्यवहार झाले त्यामध्ये भ्रष्टाचार असल्याचा आरोप करत प्रकाश बेलवाडे यांनी हे संचालक मंडळ बरखास्त आणि अपात्र करावे, अशी याचिका न्यायालयात प्रलंबित आहे त्याचा निकाल लागण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.