Gopichand Padalkar : जयंत पाटलांच्या पराभवाचा गोपीचंद पडळकारांनी सांगितला प्लॅन; इस्लामपूरचा पुढचा उमेदवारही ठरवला!

Jayant Patil Defeat : जयंत पाटील हा महाराष्ट्राच्या राजकारणातील फार मोठा विषय राहिलेला नाही. त्यांचा एक भाचा आमदार होता, तो त्यांचा समर्थक होता. दुसरे समर्थक होते, शिराळ्याचे मानसिंंगराव नाईक. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असताना, राज्यात मंत्री असताना जयंतरावांचे दोनच आमदार समर्थक होते.
Jayant Patil-Gopichand Padalkar
Jayant Patil-Gopichand Padalkar Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur, 22 March : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमपुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीवरून आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. जयंत पाटील हा किरकोळ माणूस आहे, लोकांनी त्यांना आता फक्त 11 हजारांवर आणून ठेवलं आहे. पुढच्या वेळी ते राजकारणात राहू शकत नाहीत. सदाभाऊ खोत किंवा त्यांचा मुलगा सागर खोत यांच्यासारखा सक्षम उमेदवार इस्लामपूरमध्ये ताकदीने लढला, तर जयंतराव पडू शकतात आणि मी आहेच की सर्व बहुजन त्या उमेदवाराच्या पाठीमागं लावणार, असा प्लॅनच आमदार गोपीचंद पडळकरांनी सांगून टाकला.

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले, जयंत पाटील हा महाराष्ट्राच्या राजकारणातील फार मोठा विषय राहिलेला नाही. त्यांचा एक भाचा आमदार होता, तो त्यांचा समर्थक होता. दुसरे समर्थक होते, शिराळ्याचे मानसिंंगराव नाईक. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असताना, राज्यात मंत्री असताना जयंतरावांचे दोनच आमदार समर्थक होते. आता त्यांचा आमदार भाचा पडला, मानसिंगराव नाईकही पराभूत झाले. त्यांना आता राज्यात समर्थकच राहिलेला नाही. मी चाळीस हजार मतांनी निवडून आलोय, ते अकरा हजार मतांनी निवडून आलेत. जयंत पाटलांकडे ती ताकद आता राहिलेले नाही.

जयंत पाटील (Jayant Patil) हे किरकोळ माणूस आहेत, लोकांनी त्यांना फक्त अकरा हजारांवर आणून ठेवलं आहे. त्यांच्याविरोधात सक्षमपणे कोणी लढलं असतं, तर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ते पन्नास हजार मतांनी पडले असते. त्यामुळे ते कोठे गेला, कोणाला भेटले, याबाबत मला काही विशेष वाटत नाही. जयंतराव हा घरघर लागलेला माणूस आहेत, असा दावाही पडळकरांनी केला.

Jayant Patil-Gopichand Padalkar
Ashok Pawar : मुरब्बी अशोक पवारांच्या माघारनाट्यामागचा ‘डाव’ कोणाचा?; पराभवाची भीती की स्वकीयांनी पुन्हा घात केला?

आमदार पडळकर म्हणाले, जयंत पाटील यांचा कुठेही प्रभाव गट नाही. कोल्हापूर, सातारा, सोलापूर येथेही त्यांचा प्रभाव नाही. सांगली जिल्ह्यातील जत मतदारसंघात त्यांचा संबंध नाही. जतमधून त्यांच्या मुलाला निवडणूक लढविण्यासाठी चाचपणी करण्यात आली होती. वर्षभर बॅनरबाजी केली, इकडं तिकडं केलं. त्यांच्या कुठल्या सर्व्हेत तो पुढे दिसेना. त्यांच्याकडे लय मोठी कंपनी आहे, ते सर्व्हे करून घेतात, असं म्हटलं जातंय. पण, सर्व्हेत त्यांचं पोरगं काय पुढे दिसेना.

Jayant Patil-Gopichand Padalkar
Karad : जिल्हाध्यक्षांच्या पलटीने भाजप आमदाराच्या इराद्यांना सुरुंग; पृथ्वीराजबाबांच्या घरच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी

जतनंतर जयंत पाटील यांनी मुलासाठी हातकंगणले लोकसभा मतदारसंघातही प्रयत्न केला. पण, त्या ठिकाणीही सर्व्हेंचा निष्कर्ष त्यांच्या बाजूने येईना. मग, आता राहिलं काय इस्लामपूर. इस्लामपूर सोडून त्यांचं कुठं काय राहिलं नाही. इस्लामपूरमध्येही लोकांनी त्यांना फार काठावर आणून ठेवलंय. पुढच्या वेळी ते राजकारणात राहू शकत नाहीत. इस्लामपूरमध्ये सदाभाऊ खोत किंवा त्यांचा मुलगा सागर खोत यांच्यासारखा सक्षम उमेदवार ताकदीने लढला, तर जयंतराव पडू शकतात, असा दावाही पडळकरांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com