Gopichand Padalkar : पडळकरांना ओबीसी समाजाची चिंता; भीतीपोटीच राज्यभरामध्ये मेळावे...

Maharashtra Politics: ओबीसी समाज भीतीच्या छायेखाली
Gopichand Padalkar
Gopichand PadalkarSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur News: धनगर समाजाचे नेते, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणा विषयी चिंता व्यक्त केली आहे. 'मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी होत आहे. या संदर्भात अनेक नेते वारंवार याबाबतची विधाने करीत आहेत. राज्यभरातील ओबीसी समाजामध्ये भीती आहे. या भीतीपोटीच राज्यभरामध्ये ओबीसी समाजाकडून जनजागृतीचे मेळावे घेतले जात आहेत,' असे पडळकर म्हणाले.

ओबीसी आरक्षण जनजागृती आणि लढ्यासाठी येत्या पाच जानेवारीला पंढरपुरात ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने येणार असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले आहे. काल (सोमवारी) रात्री आमदार पडळकर यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीनंतर त्यांनी ओबीसी समाज भीतीच्या छायेखाली असल्याची चिंता व्यक्त केली.

Gopichand Padalkar
DSP Dalbir Singh: अर्जुन पुरस्कार विजेते डीएसपी दलबीर सिंह यांची गोळ्या झाडून हत्या

मराठा आंदोलक मनोज जरांगे हे 20 जानेवारी रोजी सरसकट मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळवून देण्यासाठी मुंबईकडे आंदोलनासाठी जाणार आहेत. तर आता ओबीसी समाज देखील आरक्षणासाठी आक्रमक होताना दिसत आहे. 5 जानेवारी रोजी पंढरपूरला ओबीसी एल्गार मेळावा होणार आहे. ओबीसी नेते छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे, महादेव जानकर , टी पी मुंडे , लक्ष्मण गायकवाड , अन्सार शेख यासह सर्व नेते पंढरपूर मेळाव्यासाठी उपस्थित राहणार असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं.

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत मनोज जरांगे पाटील व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सहभागी होणार आहेत. दुपारी चार वाजता ही बैठक आहे. 20 जानेवारीला जरांगे पाटील मुंबईकडे मराठ्यांसह रवाना होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं हालचाली सुरु केल्या असून आज मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या बैठकीत मुख्यमंत्र्यांसह दोनही उपमुख्यमंत्री मागासवर्ग आयोग आणि शिंदे समितीसह अधिकारी या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. दरम्यान जरांगे पाटीलही या बैठकीला व्हिसीद्वारे उपस्थित राहणार असून सरकारची भूमिका काय आहे हे आज स्पष्ट होईल, असे जरांगे पाटील यांनी सांगितले. 20 तारखेच्या आत आरक्षण द्या , अन्यथा आम्हाला कुणी रोखू शकत नाही, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला सरकारला दिला आहे.

Gopichand Padalkar
Pune News: चक्क रंगाच्या कंटेनरमधून दारूची वाहतूक; ‘एक्साईज’कडून एक कोटीचा माल जप्त; राजकीय धागेदोरे...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com