शिवसेना फुटल्याने जयंत पाटील यांचे सुतक अजुनही फिटेना!

आम्ही न घाबरता सरकारविरोधात काम करीत राहिलो, पण घरी बसलो नाही.
Gopichand Padalkar & Jayant Patil
Gopichand Padalkar & Jayant PatilSarkarnama

मुंबई : एकाही आमदाराला भाजप पक्ष सोडून जावे असे वाटले नाही. कारण हा विचारावर चालणारा हा पक्ष आहे. काँग्रेस, (Congress) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते काय बोलतात, त्यावर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यामागे त्यांचा भाचा सोडला तर तिसरा माणूस नाही, अशी टिका आमदार गोपिचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली. (Gopichand Padalkar criticise NCP leader Jayant Patil)

Gopichand Padalkar & Jayant Patil
पुढच्या निवडणुकीत शिवसेनेचा एकही आमदार निवडूण येणार नाही!

कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पडळकर म्हणाले, सकाळी जेव्हा बातमी आली की, शहाजीबापू सगळ्या आमदारांना घेऊन सुरतला गेले. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचा चेहरा पडला. आता नवे सरकार आले तरी अजुन त्याचे सुतक गेले नाही अशी स्थिती आहे. तुम्हाला सत्ता असेल तरच तुम्ही काम करू शकता. सत्तेच्या विरोधात तुम्ही काम करू शकत नाही. शरद पवार सतत सत्तेत राहिले म्हणून हे काम करीत होते.

Gopichand Padalkar & Jayant Patil
शिंदे सरकारमध्ये संधी मिळण्यासाठी विनायक मेटेंचे सूचक विधान; खारीला विसरू नका...

ते पुढे म्हणाले. आमचे सरकार नव्हते, म्हणून आम्ही गप्प बसलो नाही. पोलिसांची भिती दाखवली म्हणून आम्ही घरी बसलो नाही. माझ्यावरती खुनाचा गुन्हा दाखल होणार होता. एक अपघात झाला म्हणून पोलीस अटक करायला निघाले होते. सदाभाऊ खोत यांच्या मुलावर खटले झाले. गावात लोकांना तडीपार केले जात होते. म्हणून आम्ही गप्प बसलो नाही, आम्ही रोज लोकांच्या प्रश्नावर लढत राहिलो.

ते म्हणाले, अडीच वर्षे आम्ही काय कामे केले ते सोशल मिडीयात तपासा. आमचे हावभाव तपासा. आम्ही कधीच सरकारला घाबरलो नाही. सतत लोकांच्या प्रश्नावर सरकार विरोधात काम करीत राहिलो.

आमदार पडळकर यांनी देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केल. ते म्हणाले, आम्ही कधीच घरी बसणार नाही. लोकांमध्ये राहू. जेलमध्ये गेलो तरी घाबरणार नाही. जेलमध्ये जाण्याची आमची तयारी असते. भाजपचे महाराष्ट्रात १०६ आमदार निवडून आलेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप नेहेमी आक्रमक राहीला. यापुढेही तो आक्रमकपणे काम करीत राहील. देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील एकाही आमदाराची भावना झाली नाही की, भाजप सोडून जावे. आमचे विरोधक म्हणत होते, १५ आमदार आमच्या संपर्कात, तीस आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे ते सागंत राहीले. मात्र तसे काहीच घडले नाही.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com