Gopichand Padalkar : फडणवीसांच्या सल्ल्यानंतरही पडळकर आपल्या विधानावर ठाम; 'माफी कोणाची मागायची?' म्हणत पवारांना केले सवाल

Devendra Fadnavis Advice : आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावरील वादग्रस्त विधानावर ठाम भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या संयमाच्या सल्ल्यानंतरही त्यांनी माफी नाकारत शरद पवारांना सवाल केले आहेत.
Gopichand Padalkar-Devendra Fadnavis
Gopichand Padalkar-Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on
  1. सततचा वाद – भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत राज्यभरात निषेध होत असून मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांना संयमाचा सल्ला दिला.

  2. माफीस नकार – पडळकर यांनी माफीबाबत “कोणाची?” असा उलटा सवाल करत आपली भूमिका बदललेली नाही आणि “मी नंतर बोलेन” असे स्पष्ट केले.

  3. पवारांवर प्रतिप्रश्न – त्यांनी शरद पवार यांना उद्देशून, मोदी व फडणवीस यांच्या कुटुंबांवर टीका झाली तेव्हा पवारांनी निषेध का नोंदवला नाही, असा प्रश्न उपस्थित केला.

Sangli, 19 September : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे, त्यामुळे पडळकरांवर राज्यभरातून टीकेची झोड उठवली जात आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून पडळकरांना यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. मात्र, फडणवीसांच्या सल्ल्यानंतरही गोपीचंद पडळकर आपल्या विधानावर ठाम आहेत. माफी कुणाची मागायची आणि शरद पवारांनी तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता का?, असा सवाल केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना फोन करून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या विधानाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यासंदर्भात आमदार पडळकर म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्रीवर जेव्हा खालच्या पातळीवर जाऊन टीका केली, तेव्हा शरद पवार यांनी फोन केला होता का? मी तर काय त्याबाबत मीडियाबाबत पाहिलेले नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रीवर एआयच्या माध्यमातून चुकीचा व्हिडिओ तयार करण्यात आला होता. तेव्हा पवारांनी मोदी यांना फोन करून निषेध वगैरे काही नोंदविला होता. असे काही मीडियात असेल तर मला दाखवा. त्यानंतर मी या विषयावर उद्या बोलतो, असेही गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी स्पष्ट केले.

जयंत पाटील यांच्याबाबत केलेल्या विधानावरून राज्यभरात तुमचा निषेध होत आहे, असे सांगितले असता पडळकरांनी होऊ द्या. मी बोलतो नंतर या विषयावर असे उत्तर दिले.

Gopichand Padalkar-Devendra Fadnavis
Fadnavis on Padalkar : जयंत पाटलांसंदर्भातील विधानानंतर फडणवीसांचा पडळकरांना सल्ला; ‘चांगला नेता म्हणून भविष्यात तुम्हाला मोठी संधी;पण...’

या विधानाप्रकरणी माफी मागावी, अशी मागणी होत आहे, असे पत्रकारांनी विचारले असता, कोणाची? कोणाची? असा उलटा सवाल पडळकरांनी केला. तेव्हा पत्रकारांनी जयंत पाटील यांची असे सांगितले असता, कशासाठी? मी या प्रकरणावर नंतर बोलतो, असेही पडळकरांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता का, असा सवाल केला असता ते म्हणाले की आरोग्य विभागाच्या एका बैठकीत मी होतो. गावगाड्यातील लोकांना चांगले उपचार मिळाले पाहिजेत. त्यांच्यावर मोफत उपचार झाले होते. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत जेवढी हॉस्पिटल आहेत, त्यांना काही अडचणी आहेत का, यावर चर्चा झाली. त्या बैठकीत मी दोन तास होतो, असेही गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केले.

Gopichand Padalkar-Devendra Fadnavis
Gopichand Padalkar: आमदार गोपीचंद पडळकर हा भाजपने माजवलेला नेता, तोच भाजपचा घात करील?

गोपीचंद पडळकर कोणत्या विधानामुळे वादात आले?
उ. – त्यांनी राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांच्यावर वैयक्तिक टीका केली.

प्र.2: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय केले?
उ. – त्यांनी पडळकर यांना फोन करून संयम बाळगण्याचा आणि शब्दांचा विचारपूर्वक वापर करण्याचा सल्ला दिला.

प्र.3: पडळकर माफी मागणार आहेत का?
उ. – नाही, त्यांनी माफीबाबत थेट नकार देत “कोणाची?” असा प्रतिप्रश्न केला.

प्र.4: पडळकरांनी शरद पवारांविषयी काय विचारले?
उ. – मोदी किंवा फडणवीस यांच्या कुटुंबांवर टीका झाली तेव्हा पवारांनी फोन करून निषेध का केला नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com