Governor in Mahabaleshwar : राज्यपाल बैस आजपासून महाबळेश्वर मुक्कामी; लोकप्रतिनिधी-अधिकाऱ्यांशी साधणार संवाद

Ramesh bais satara tour :इंग्रजांच्या काळापासून प्रत्येक वर्षी राज्यपाल हे उन्हाळ्यात महाबळेश्वर मुक्कामी असतात. त्यावेळेपासून सुरू झालेली प्रथा आजही कायम आहे.
Ramesh Bais
Ramesh BaisSarkarnama

Satara news : राज्यपाल रमेश बैस हे आज पासून महाबळेश्वर (सातारा) च्या दौऱ्यावर येत आहेत. इंग्रजांच्या काळापासून प्रत्येक वर्षी राज्यपाल हे उन्हाळ्यात महाबळेश्वर मुक्कामी असतात. त्यावेळेपासून सुरू झालेली प्रथा आजही कायम आहे. या प्रथेनुसार राज्यपाल आजपासून आठ दिवस महाबळेश्वरला मुक्कामी यात आहेत. या काळात ते राजभवन येथे मुक्कामी राहून विविध कार्यक्रमास उपस्थित राहतात.

राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) आज (मंगळवार, ता. 21 मे) सायंकाळी सहा वाजता मुंबईतील राजभवन येथून हेलिकॉप्टरने निघून महाबळेश्वर (Mahabaleshwar) येथील राजभवन येथे त्यांचे आगमन होईल. महाबळेश्वरच्या राजभवन येथे बुधवारी (ता. 22) दुपारी तीन वाजता इंडियन रेडक्रॉस सोसायटी स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेतील. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत बैठक (Meeting) घेऊन आढावा घेतील. दुपारी 4.30 वाजता ग्रामीण रुग्णालय महाबळेश्वर येथे आगमन व रुग्णालयाची पहाणी करतील. सायंकाळी 5.10 राजभवन येथे आगमन व मुक्काम राहील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ramesh Bais
BSP Mayawati News : 'युपी'त मायावतींचे सोशल इंजिनिअरींग फेल, बसपची घसरगुंडी कशी रोखणार..?

गुरुवारी 23 मे रोजी सकाळी 10.15 वाजता श्रीक्षेत्र महाबळेश्वर मंदिर येथे आगमन व दर्शन पूजेसाठी राखीव असेल. त्यानंतर 11.15 वाजता राजभवन येथे आगमन व राखीव राहील. दुपारी 2.30 वाजता कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ अधिकाऱ्यांशी बैठक करतील. दुपारी 3.30 वाजता स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करतील.

राज्यपाल शुक्रवारी 24 मे रोजी दुपारी 2.30 वाजता मधाचे गाव मांघर (ता. महाबळेश्वर) येथे आगमन व पहाणी करतील. दुपारी 3.10 वाजता राजभवाकडे मोटारीने प्रयाण व मुक्काम असेल. शनिवारी (ता. 25 मे) दुपारी 12 वाजता राजभवन येथून मोटारीने पाचगणीकडे प्रयाण करतील. दुपारी 12.30 वाजता न्यू ईरा हायस्कूल पाचगणी येथे आगमन व हेलिकॉप्टरने राजभवन मुंबईकडे जातील.

Edited By : Vijay Dudhale

Ramesh Bais
Dhule Lok Sabha Constituency : मतदान नकली पण असते का? धुळ्यात काय घडले?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com