Dhule Lok Sabha Constituency : मतदान नकली पण असते का? धुळ्यात काय घडले?

Dhule Lok Sabha Election 2024 : धुळे शहरात बोगस मतदानावरून निर्माण झाला तणाव पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने अनुचित प्रसंग टाळला
Shobha Bachhav Subhash Bhamre
Shobha Bachhav Subhash Bhamre sarkarnama

Dhule News 21 May : मतदान प्रक्रियेत उमेदवार आणि त्यांचे अनुयायी अतिशय जोमाने काम करतात. राजकीय कार्यकर्ते मतदान प्रक्रियेत अनेकदा गैरप्रकार करीत असल्याचे प्रकारही घडतात. धुळ्यातही ( Dhule ) अशाच एका अफवेने मतदानादरम्यान तणाव निर्माण झाला.

धुळे मतदारसंघात ( Dhule Lok Sabha Constituency ) महायुतीचे विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे ( Subhash Bhamre ) आणि काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव ( Shobha Bachhav ) या दोन्ही उमेदवारांत चुरस आहे. त्यांचे कार्यकर्ते अतिशय जोमाने कामाला लागले होते. धुळे मतदारसंघाला वादाची राजकीय पार्श्वभूमी आहे. मतदानातही दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी अतिशय झोकून देऊन मतदान करून घेतले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या मतदासंघात धुळे शहरातील महापालिका शाळा क्रमांक 9 या मतदान केंद्रावर सोमवारी ( ता. 20 ) दिवसभर मतदानादरम्यान तणाव होता. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस व मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांत जोश होता. त्यामुळे काही कार्यकर्त्यांत खटकेही उडाले होते. हा संवेदनशील भाग असल्याने मोठा पोलिस बंदोबस्त होता.

दुपारी अकराच्या सुमारास या मतदान केंद्रावर नकली मतदान झाले, अशी चर्चा पसरली. या चर्चामुळे कार्यकर्त्यांत तणाव होता. प्रत्येक जण नकली मतदान झाले म्हणजे काय झाले? याची चौकशी करत होता. या चर्चेने नवभारत चौकातील कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला. त्याचे पडसाद म्हणून कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. वीज कंपनीच्या डीपीवर दगडफेक झाल्याने ती बातमी शहरभर पसरली.

Shobha Bachhav Subhash Bhamre
Dhule Lok Sabha 2024 voting News : भाजपमध्ये आता राम आहे की नाही? धुळ्यात मतदानासाठी गर्दी; मतदार म्हणाले...

ही माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलिस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी आदींनी मतदान केंद्रावर तसेच नवभारत चौकात जाऊन शांतता प्रस्थापित केली. नकली मतदान झालेले नाही. नकली म्हणजे कोणीतरी दुसऱ्याच्या नावावर मतदान करून गेले, असा त्याचा अर्थ होता. प्रत्यक्षात तसे झालेले नव्हते. प्रशासनाने पदाधिकाऱ्यांना ते पटवून दिले. त्यानंतर कार्यकर्ते शांत झाले.

निवडणुकीच्या मतदानादरम्यान नकली मतदान झाले, ही चर्चा पसरल्याने राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये देखील वेगळ्याच संशय निर्माण झाला होता. उमेदवार त्याबाबत वारंवार चौकशी करून माहिती घेत होते. या सगळ्यांमुळे परिसरात तणाव होता. आझाद नगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक धीरज महाजन यांची या सर्व प्रकारामुळे चांगलीच धावपळ उडाली. त्यांनी बंदोबस्त वाढवून याबाबत गैरसमज दूर केला

( Edited By : Akshay Sabale )

Shobha Bachhav Subhash Bhamre
Dhule Lok Sabha 2024 voting News : भाजपमध्ये आता राम आहे की नाही? धुळ्यात मतदानासाठी गर्दी; मतदार म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com