Maharashtra's Political Crisis : नैतिकतेच्या आधारावर सरकारने त्वरित राजीनामा द्यावा : पृथ्वीराज चव्हाण

Supreme Court सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण बोलत होते
Prithviraj Chavan
Prithviraj Chavansarkarnama
Published on
Updated on

Prithviraj Chavan News : सुप्रीम कोर्टाने शिंदे गट पक्षावर दावा करू शकत नाही, तसेच भरत गोगावले यांची व्हीप म्हणून केलेली नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे मत नोंदविले आहे. ज्याअर्थी संवैधानिक पदावर असलेल्या राज्यपाल, विधिमंडळ अध्यक्षांवर ओढलेले ताशेरे, यावरून हे सरकार बेकायदा पद्धतीने अस्तित्त्वात आल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. यामुळे कोर्टाने ओढलेले ताशेरे गंभीर स्वरूपाचे असल्याने सद्याच्या शिंदे-फडणवीस सरकारने नैतिकतेच्या आधारावर तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

सुप्रीम कोर्टाच्या Supreme Court निर्णयानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण ही चूक होती त्यांनी फ्लोअर टेस्ट चा सामना करायला हवा होता असे मत पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan यांनी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर लगेचच काही वेळात दिले होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कायदेशीर रित्या उद्धव ठाकरेनी राजीनामा देण चूक असली तरी नैतिकता जपणाऱ्या उद्धव ठाकरेनी Udhav Thackeray त्यावेळी राजीनामा दिला. ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे सरकार अस्तित्त्वात आलं, त्यानंतर जो घोडाबाजार झाला, हे पाहता सरकार बेकायदा, असंवैधानिक आहे.

Prithviraj Chavan
Prithviraj Chavan: कर्नाटकात आमचचं सरकार येणार ; 113 पेक्षा जास्त जागा मिळणार पृथ्वीराज चव्हाण यांचा विश्वास

याकरता पुढची न्यायालयीन कारवाई निश्चितच केली जाईल. माझी या ठिकाणी मागणी आहे की इतकी गंभीर ताशेरे संवैधानिक पदावर बसलेल्या लोकांवर ओढले आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. न्यायालयीन झगडे, कोर्ट कचेऱ्या वाचवण्याकरता नैतिकतेच्या आधारावर शिंदे-फडणवीस सरकारने त्वरीत राजीनामा दिला पाहिजे आणि नवं सरकार महाराष्ट्रामध्ये गठन केलं पाहिजे

Prithviraj Chavan
सत्तासंघर्षाच्या निकालावर Ulhas Bapat यांची पहिली प्रतिक्रीया | Supreme Court | Eknath Shinde

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com