Graduate Constituency Election : पक्षाने सांगितलं तर सत्यजीत तांबेंना पाठिंबा देऊ : विखे पाटलांनी स्पष्टच सांगितलं!

Graduate Constituency Election : एबी फॉम काँग्रेसच्या सुधीर तांबे यांना मात्र...
Graduate Constituency Election :
Graduate Constituency Election :Sarkarnama
Published on
Updated on

Graduate Constituency Election : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून अखेर सस्पेंस संपला आहे. काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे, तर काँग्रेसने ज्यांना उमेदवारी घोषित केली होती, ते उमेदवार सत्यजीत यांचे वडील सुधीर तांबे यांनी निवडणूक अर्ज दाखल केला नाही. यामुळे त्यांनी आता माघार घेतल्याचे स्पष्ट आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सत्यजित तांबे असतील. यावेळी सत्यजीत तांबे यांनी महाविकास आघाडीसोबतच भाजप आणि शिंदे गटाने आपल्याला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.

यावर आता भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटी़ल यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. विखे पाटील म्हणाले, "निवडणूक प्रक्रियेमध्ये पक्षश्रेष्ठी निर्णय घेतात. त्यानंतर कार्य करायची आमची भूमिका असते. कोणाला उमेदवारी मिळते त्याची आम्ही वाट पाहत होतो. बरेचसे उमेदवार इच्छुक होते. आज उमेदवारी दाखल करायची शेवटची तारीख होती. भाजप जी भूमिका घेऊन काम करते, त्याचं स्वागत आहे. सत्यजीत तांबेंशी माझं बोलणं झालं नाही. त्यांच्याबद्दलचा निर्णय पक्षश्रेष्ठी करतील. पक्षाने त्यांना पाठिंबा दिला तर आम्ही सत्यजीतला पाठिंबा देऊ," असे जाहीरपणे विखे पाटील म्हणाले.

Graduate Constituency Election :
Nashik Legislative Council Elections : नाशिक पदवीधरचा सस्पेन्स संपला; सत्यजीत तांबे अपक्ष उमेदवार

दरम्यान, सत्यजीत तांबे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत. भाजपची कोणतीही ऑफर नव्हती असे ते म्हणाले. काँग्रेस पक्षाची इच्छा होती. मात्र, एबी फॉम सुधीर तांबे यांना दिला गेला होता. काही तांत्रिक अडचणा आल्या त्यामुळे मी अपक्ष अर्ज भरला आहे, असेही तांबे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com