Gram Panchayat Election : भ्रष्टाचार करणार नाही, कामांचे कोणतेही कंत्राट घेणार नाही; भावी गावकारभाऱ्यांनी घेतली शपथ

भ्रष्टाचारमुक्त ग्रामपंचायतीसाठी घेतलेली ही शपथ यंदा के. के. पाटील गटाचा विजय सुकर करेल का हे निकालानंतरच कळेल.
Candidate of Nimgaon Gram Panchayat
Candidate of Nimgaon Gram PanchayatSarkarnama

सोलापूर : सध्या राज्यभरात सार्वत्रिक ग्रामपंचायत (Gram Panchayat) निवडणुकीची (Election) रणधुमाळी सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे वादविवाद आणि टोकाचे राजकारण असे समीकरण बहुतांश ठिकाणी पाहायला मिळते. ग्रामपंचायतीची सत्ता हस्तगत करून तालुक्याच्या राजकारणात राजकीय वजन वाढवण्यासाठी सगळीकडेच स्थानिक गटप्रमुख जोरदार ताकद लावत असतात. धनलक्ष्मीचा वर्षाव करून मतदारांना प्रभावित देखील केले जात असल्याचे चित्र आहे. (Gram Panchayat candidates took oath for corruption free governance)

एकीकडे हे सगळ सुरू असताना सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या निमगाव (म) ग्रामपंचायतीची निवडणूक अटीतटीची झाली आहे. थेट जनतेतून सरपंचपद हे यंदा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. भाजप (BJP) राज्य कार्यकारणी सदस्य के. के. पाटील यांच्या नेतृत्वात ग्रामविकास आघाडी पॅनेल निवडणुकीसाठी उभा आहे. या गटाकडून अनुभवी असणारे माजी सरपंच सुभाष साठे मैदानात आहेत. तर पाटील यांचे पारंपरिक विरोधी असणाऱ्या मल्लसम्राट रावसाहेब मगर यांच्या सहकार महर्षी पॅनलकडून नवखे उमेदवार राजेंद्र सोपान तोरणे हे निवडणूक लढवत आहेत. निमगाव ग्रामपंचायतीवर बहुतांश वेळा रावसाहेब मगर गटाचीच सत्ता राहिली आहे.

Candidate of Nimgaon Gram Panchayat
Nabam Rebia Case : नाबाम रेबिया खटल्यातील हा मुद्दा शिवसेनेसाठी अडचणीचा ठरण्याची शक्यता

गेल्या पाच वर्षातील कार्यकाळात विकासकामे झाली नसून ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची चर्चा दबक्या आवाजात ग्रामस्थ करत असून यावेळी रावसाहेब मगर गटासाठी ही निवडणूक आव्हानात्मक आणि अटीतटीची असणार आहे.

Candidate of Nimgaon Gram Panchayat
Thackeray Vs Shinde : सर्वोच्च न्यायालयातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीत शिवसेनेचा होमवर्क कमी : उज्ज्वल निकम यांचे निरीक्षण

के. के. पाटील गट यंदा गावच्या सर्वांगीण विकासाच्या मुद्द्यावर आणि भ्रष्टाचारविरोधी मुद्द्यावर निवडणूक लढवत आहे. याच अनुषंगाने गुरुवारी (ता. १६ डिसेंबर) सायंकाळी पार पडलेल्या जाहीर सभेत ग्रामविकास आघाडी पॅनेलच्या सर्व उमेदवारांनी निवडून आल्यानंतर कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार करणार नाही, विकासकामांमध्ये कंत्रादारांकडून टक्केवारी मागणार नाही व विकासकामांचे कोणतेही कंत्राट घेणार नाही, अशी शपथच घेतली. त्यामुळे भ्रष्टाचारमुक्त ग्रामपंचायतीसाठी घेतलेली ही शपथ यंदा के. के. पाटील गटाचा विजय सुकर करेल का? हे निकालानंतरच कळेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com