Solapur Lok Sabha : लोकसभेसाठी कपिल पाटील सोलापूर भाजपचे नवे ‘कॅप्टन’ : उमेदवार निवडीपासून ही आहेत तगडी आव्हाने

कपिल पाटील यांच्याकडे सोलापूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी असणार आहे.
Kapil Patil
Kapil Patil Sarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाकडून (BJP) संघटना बांधणीसाठी लोकसभा प्रवास योजना सुरू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत केंद्रीय मंत्र्यांकडे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये सोलापूर (Solapur) लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी भिवंडीचे खासदार आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. पाटील यांच्यापुढे सोलापूरमधील भाजप नेत्यांना एकत्रित आणून कागदावर दिसणारी ताकद प्रत्यक्षात निवडणुकीत उतरवावी लागणार आहे. दुसरीकडे, सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीच्या निमित्ताने भाजपवर होणारी आगपाखडही रोखावी लागणार आहे. त्यामुळे पाटील यांच्यापुढे तसे मोठे आव्हान असणार आहे. (Kapil Patil has the responsibility of Solapur Lok Sabha Constituency)

दरम्यान, ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्याकडे विदर्भातील भंडारा, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, अमरावती, वर्धा आणि रामटेक या सात मतदारसंघाचे प्रभारीपद असणार आहे. रावसाहेब दानवे यांच्याकडे लातूर आणि मावळ, पियूष गोयल यांच्याकडे ठाणे आणि उत्तर पश्चिम मुंबई, नारायण राणेंकडे सांगली, डॉ. भागवत कराडांकडे परभणी व धुळे, तर डॉ. भारती पवार यांच्याकडे नाशिकच्या प्रभारीपदाची जबाबदारी असणार आहे.

Kapil Patil
Tukaram Munde Transfer : तुकाराम मुंडेंच्या बदलीने भाजपच्या 'त्या' प्लॅनला लागला ‘ब्रेक’!

येत्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ४०० जागा जिंकण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. प्रत्येक केंद्रीय मंत्र्यांवर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामध्ये भिवंडीचे खासदार आणि केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदाची जबाबदारी असणार आहे. सुशीलकुमार शिंदे यांचा २००९ चा अपवाद वगळता २००३ पासून आजतागायत भाजपचे वर्चस्व सोलापूर मतदारसंघावर राहिले आहे. त्यामुळे सोलापूर मतदारसंघ तसा भाजपचा बालेकिल्ला वाटत असला तरी पक्षातील नेत्यांमध्ये पूर्वीसारखी एकवाक्यता राहिली नाही. सत्तेमुळे भाजप नेत्यांमध्ये रुसवे-फुगवे वाढले आहेत. त्या सर्वांना एकत्रित आणण्याचे काम पाटील यांना करावे लागणार आहे.

Kapil Patil
Maharashtra-Karnataka Border Dispute : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची फुशारकी : म्हणे ‘महाराष्ट्राची याचिका सुप्रीम कोर्टात टिकणार नाही..’

सोलापूर शहर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट या लिंगायत बहुल मतदारसंघामध्ये सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीचा मुद्दा परिणामकारक ठरणार आहे. भाजपने उघडपणे चिमणीच्या विरोधात भूमिका घेतलेली दिसत नसली तरी सत्ताधारी म्हणून धर्मराज काडादी व कारखान्याचे प्रशासन, कारखान्याशी निगडीत लोकांकडून भाजपवर राग निघण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे सत्ताधारी असूनही विमानतळाचा प्रश्न सोडवू न शकल्याची नाराजी भाजपलाच झेलावी लागणार आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यापुढे आव्हान मोठे असणार आहे.

Kapil Patil
Maharashtra-Karnataka Border Dispute कर्नाटक सरकारने महाराष्ट्राला पुन्हा डिवचले : जत तालुक्यासाठी पाणी सोडले

विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांची ठराविक कार्यक्रमांना दिसणारी हजेरी वगळता ते फारसे सक्रीय आहेत, असे मागील अडीच-तीन वर्षांच्या त्यांच्या कामावरून तरी वाटते. पक्षबांधणीसाठी विद्यमान खासदारांकडून काय काम झाले, हा संशोधनाचाच विषय आहे. ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव करून जायंट किलर ठरलेले शरद बनसोडे यांच्याप्रमाणे जयसिद्धेश्वर स्वामीही एकाच टर्मचे खासदार ठरणार की काय अशी सद्यस्थिती आहे.

Kapil Patil
BJP War Room : कोकणातील नेत्याच्या खांद्यावर भाजपच्या वॉर रूमची जबाबदारी!

सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपसाठी सोपा वाटत असला तरी नेत्यांमधील वाढलेले मतभेद, सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी, विमानतळ यांसारखे प्रश्न कपिल पाटील यांच्यापुढे असणार आहेत. दुसरीकडे उमेदवार ठरविण्यासाठीही पक्षाला कसरत करावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com