Gram Panchayat Election Results : एकच वादा अजितदादा! राज्यात अजित पवार गटाचा डंका; इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांना धक्का

Gram Panchayat Election Results Ajit Pawar Gat Baramati, Indapur : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासाठी मोठी गुड न्यूज आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाने अजित पवार गटात आनंदाचं वातावरण आहे...
Ajit Pawar, Harshvardhan Patil
Ajit Pawar, Harshvardhan Patil Sarkranama
Published on
Updated on

Maharashtra Gram Panchayat Election Results : राज्यातील २, ३५९ ग्रामपंचायतींचे निकाल लागत आहेत. या निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले होते. आणि आज मतमोजणी सुरू असून, निकाल हाती येत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालात भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या महायुतीला मोठं यश मिळताना दिसत आहे. विशेष म्हणजे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला ग्रामीण भागाची पसंती मिळाली आहे. यामुळे पुणे जिल्ह्यात अजित पवारांचा दबदबा कायम आहे.

Ajit Pawar, Harshvardhan Patil
Gram Panchayat Election Results : निवडणुकीत संपूर्ण गाव जिंकलं अन् एकच धुरळा उडाला!; बघा जुन्नरमधील पारुंडे गावात काय घडलं...

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाने राज्यात राजकीय धुरळा उडाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने राज्यातील १०० हून अधिक ग्रामपंचायतींवर झेंडा फडकवला आहे. भाजप सोबत जाऊनही अजित पवारांचा करिश्मा अजूनही कायम असल्याचं या निकालावरून समोर येत आहे. यामुळे अजित पवार गटात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. बारामतीमधील १८ ग्रामपंचातींवर अजित पवार गटाचं वर्चस्व असल्याचं समोर आलं आहे.

अजित पवार गटाने इंदापूरमध्ये भाजपच्या हर्षवर्धन पाटील यांनाही जोरदार धक्का दिला आहे. इंदापूरमधील शिंदेवाडी आणि वकीलवस्ती ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाची एक हाती सत्ता आली आहे. यामुळे वकीलवस्ती आणि शिंदेवाडी गावात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे.

शिंदेवाडी आणि वकीलवस्ती ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात आली आहे. शिंदेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पल्लवी सौरभ झगडे या विजयी झाल्या आहेत. शिंदेवाडी ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदासह सदस्यांच्या ९ जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत.

वकीलवस्ती ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. वनिता बाळू भोसले या सरपंचपदी विजयी झाल्या आहेत. वकीलवस्तीच्या नऊ सदस्यांपैकी सहा राष्ट्रवादी, तर तीन भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. बारामती आणि इंदापूर तालुक्यावर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांची पकड घट्ट असल्याचं या निकालांवरून स्पष्ट होत आहे.

Ajit Pawar, Harshvardhan Patil
Gram Panchayat Election Result 2023 : कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांना धक्का, तर राम शिंदेंनी मारली बाजी !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com