Gram Panchayat Election Results : ग्रामपंचायतीचा शिपाई झाला गावचा सरपंच!; पाणीवाला बाबाने सर्वांचं मन जिंकलं

Maharashtra Gram Panchayat Election 2023 Ashwi Sangamner : ग्रामपंचायत निवडणुकीत गावाची गेल्या ४० वर्षांपासून सेवा करणाऱ्या पाणीवाल्या बाबाचा विजय झाला आहे....
Gram Panchayat Election Results
Gram Panchayat Election ResultsSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Gram panchayat Election Result : ज्या ग्रामपंचायतीत अनेक वर्षे पाणीपुरवठा विभागात शिपाई म्हणून काम केले, त्याच ग्रामपंचायतीमध्ये सरपंच म्हणून काम करण्याचा मान एका व्यक्तीला लाभला आहे. सरपंचपद राखीव झाल्याने मिळालेली संधी आणि नागरिकांनी धरलेला आग्रह पाहता पाणीपुरवठा विभागातील शिपायानं आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि थेट सरपंचपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात ते उतरले. नागरिकांचा असलेला उत्स्फूर्त पाठिंबा, यामुळे त्यांनी घवघवीत मते मिळवत सरपंचपदावर विराजमान होण्याचा मान मिळवला आहे.

Gram Panchayat Election Results
Gram Panchyat Election Results : मंत्री विखेंनी ग्रामपंचायत निवडणुकीतील दणदणीत विजयांचं श्रेय दिले...

माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या संगमनेर तालुक्यातील आश्वी गाव तसे संगमनेर तालुक्यात असले तरी विधानसभेला राधाकृष्ण विखे यांच्या राहता विधानसभा मतदारसंघात येते. या आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये नामदेव किसन शिंदे हे पाणीपुरवठा विभागात शिपाई म्हणून गेली 40 वर्षे काम करत होते. मात्र, यंदा आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण पडले आणि त्यामुळे साहजिकच या प्रवर्गात येत असल्याने नामदेव शिंदे यांना गावातील नागरिकांनी सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी उभे राहण्याचा आग्रह केला.

तालुक्याचे आमदार माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे नामदेव शिंदे यांनी ग्रामपंचायतीतील नोकरीचा राजीनामा देत त्याच ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला. संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात प्रणित अमरेश्वर ग्रामविकास मंडळाकडून नामदेव शिंदे यांनी आपली उमेदवारी दाखल केला. मात्र, उमेदवारी दाखल करण्यापूर्वी गेली 40 वर्षे ते याच ग्रामपंचायतीमध्ये गावाला पाणीपुरवठ्याचं काम करत होते. त्या शिपाईपदाचा त्यांना राजीनामा द्यावा लागला.

शिंदे यांनी 40 वर्षे गावाला पाणीपुरवठ्याचं काम करून केलेली ग्रामसेवा ही मतदारांना भावली होती आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा चंग बांधला आणि निवडणूक निकालानंतर नामदेव शिंदे हे आश्वी बुद्रुक गावचे सरपंच झाले. ज्या ग्रामपंचायतीमध्ये शिपाई म्हणून काम केलं, त्याच ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच म्हणून बसण्याचा मान त्यांना आता मिळाला आहे

निकालानंतर स्वतः आमदार बाळासाहेब थोरात यांनी सरपंच झालेल्या नामदेव शिंदे यांचा सत्कार करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या विजयाबद्दल शिंदे यांनी सांगितले की, "कधीही गावचा सरपंच होईल असं स्वप्नातही आलेले नव्हते. मात्र, यंदा अनुसूचित जमातीसाठी आरक्षण पडले आणि त्यानंतर गावातीलच नागरिकांनी मोठा आग्रह केला आणि त्यामुळे नोकरीचा राजीनामा देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलो. या विजयाचे मानकरी सर्व गावकरी आहेत", असे त्यांनी नम्रपणे सांगितले. आता यापुढे सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याने शासकीय योजना प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न करू, असं नामदेव शिंदे म्हणाले.

Gram Panchayat Election Results
Gram Panchyat Election Results 2023 : काँग्रेसकडे सर्वाधिक तरीही विखे वरचढ, 'बीआरएस'ची ओपनिंग

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com