Gram Panchyat Election Results : नेवाशात ठाकरेंच्या शिलेदाराची बॅट तळपली, गडाखांचा सोळापैकी बारा ग्रामपंचायतींवर डंका

Newasa Political News : तालुक्यातील बहुतेक गावात आमदार गडाख यांना मानणाऱ्या दोन गटात लढत झाली.
Newasa Political News
Newasa Political News Sarkarnama
Published on
Updated on

विनायक दरंदले

Ahmednagar News : राज्यातील २३५९ ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत.या निवडणुकीत भाजपासह महायुतीची सरशी पाहायला मिळत आहेत.तर ठाकरे गटासह शरद पवार गटाला या निवडणुकीत मोठा धक्का बसल्याचं दिसून येत आहे.अशातच नगर जिल्ह्यातही मातब्बर नेत्यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे आमदार शंकरराव गडाख यांच्या गटाने नेवासे तालुक्यात झालेल्या सोळा ग्रामपंचायत निवडणुकीत उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे आमदार शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांच्या गटाने सोळापैकी बारा ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपद व सदस्य निवडून आणण्यात यश मिळविले आहे.

करजगावात माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे गटाचा सरपंच झाला.पानेगाव व कौठे येथे अपक्ष तर माजी खासदार तुकाराम गडाख यांच्या गटाचा पानसवाडी येथे सरपंच निवडून आला आहे.गडाखांच्या बॅट चिन्हाने सर्वच गावात चौफेर बॅटिंग केली आहे.

Newasa Political News
Gram Panchayat Election : चिंचवाड ग्रामस्थांनी 'बंटी व मुन्नाच्या' कारभाऱ्यांना दाखवला ठेंगा, अपक्षांना दिला कौल

तालुक्यातील बहुतेक गावात आमदार गडाख यांना मानणाऱ्या दोन गटात लढत झाली.कौठे येथे दोन्ही गडाखांच्या तुल्यबळ लढतीत अपक्ष उमेदवार प्रमोद गजभार सरपंच झाल्याने येथील काळे व शेळके गटाच्या पंचवीस वर्षाच्या सत्तेला हदरा बसला आहे. करजगाव येथे गडाख गटाने अतोनात प्रयत्न करुनही सरपंचपद मुरकुटे गटाने जिंकले.

करजगावात पहिल्यांदाच गडाख गटाचे बहुमत झाले आहे. पाचेगाव, भानसहिवरे व मुकिंदपुर या गावात आमदार गडाख गटाने बाजी मारली. पानेगावात गडाख गटाच्या दोन्ही मंडळाच्या सरपंच उमेदवारास अपक्ष उमेदवार निकिता भोसले यांनी अस्मान दाखविले. पानसवाडीत अपेक्षेप्रमाणे माजी खासदार गडाख गटाने सरपंचपद व सत्ता राखली.(Election)

तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या(Gram Panchyat) निमित्ताने बहुतेक गावात आमदार गडाख गटाला मानणा-या दोन गटात लढत पाहण्यास मिळाली. 'भाजपा' चे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे गट करजगाव सोडून कुठेच प्रभावी विरोधक म्हणून दिसला नाही. काँग्रेस,राष्ट्रवादी व शिवसेना( शिंदे गटाचे) उमेदवार कुठल्याच गावात ऊभे नव्हते.

मुरकुटे यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या सौंदाळा, शहापूर,फत्तेपुर,देडगाव या गावात गडाख गटाने बाजी मारली. निवडणुक निकालानंतर गडाख गटाने तेरा ग्रामपंचायतीवर दावा केला तर भाजपाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी यांनी करजगाव, शहापूर व कौठा आमच्या ताब्यात आल्याचे सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

Newasa Political News
Gram Panchyat Election Results 2023 : काँग्रेसकडे सर्वाधिक तरीही विखे वरचढ, 'बीआरएस'ची ओपनिंग

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com