Balinga Gramsabha : बालिंगा ग्रामसभेत सत्ताधारी- विरोधक भिडले; काय आहे प्रकरण ?

Kolhapur Balinga Gramsabha : ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी व विरोधी गटात विविध प्रश्नांवर शा‍ब्दिक वादा वादी झाली एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला आहे.
balinda Gramsabha
balinda GramsabhaSarkarnama
Published on
Updated on

ग्राम पंचायत बालिंगेची ग्रामसभा जलजीवन मिशन, घरफाळा, गायरान जमीन वाटप या विषयांवरून ग्रामसभा वादग्रस्त होण्याची शक्यता होती. ग्रामसेवक रमेश कारंडे यांनी जोपर्यंत कोरम पूर्ण होत नाही तोपर्यंत ग्रामसभा सुरू करण्यात येणार नाही, असे सांगितल्यानंतर दुपारी एकपर्यंत ८६ ग्रामस्थांच्या सह्या रजिस्टरला झाल्या. त्यामुळे ही ग्रामसभा कोरमअभावी तहकूब करण्यात झाल्याचे सरपंच, ग्रामपंचायत, सदस्यांनी जाहीर केले. मात्र तत्पूर्वी ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी व विरोधी गटात विविध प्रश्नांवर शा‍ब्दिक वादा वादी झाली एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला.

सरपंच सुधा वाडकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडणार होती. ग्रामसभेचा (Gramsabha) कोरम पूर्ण होण्यासाठी १०१ ग्रामस्थांच्या सह्या होणे आवश्यक होते. मात्र, अवघ्या ८६ ग्रामस्थांच्या सह्या झाल्याने कोरमअभावी ग्रामसभा तहकूब केले आहे १० सप्टेंबरला ग्रामसभा घेण्यात येणार आहे.

balinda Gramsabha
Kolhapur Politics : 'वस्ताद येत आहेत' म्हणत पालकमंत्र्यांविरोधात समरजित घाटगेंनी ठोकला शड्डू, थेट मुश्रीफांच्या दारातच पक्षप्रवेश

मात्र तत्पूर्वी जलजीवन मिशन पाणी योजना, घरफाळा वसुली, ग्रामपंचायत बांधकामाची निविदा लावलेली नाही. दहा वर्षांचा घरफाळा हिशेब द्यावा, पंधराव्या वित्त आयोगाचा २०२० ते २४ खर्च दाखवावा, गावठाण वाटप व शिल्लक गावठाण याची माहिती मिळावी, बेकायदा बांधकामाची माहिती मिळावी, असे प्रश्न राजेश पाटील (Rajesh Patil) यांनी ग्रामसभेस उपस्थित करणार होते. पण, कोरमअभावी ग्रामसभा तहकूब केल्याचे जाहीर होताच गोंधळ निर्माण झाला.

balinda Gramsabha
Udayanraje On Statue Collapse : उदयनराजेंची पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेवर पहिली प्रतिक्रिया; राजकारण करणाऱ्यांना झापलं

यावेळी विरोधी गट व सत्ताधारी गटात शा‍ब्दिक वादावादी झाली. तुमच्या सांगण्यावरून ग्रामसभा घ्यायची का? तुम्ही तुमचा भ्रष्टाचार लपवायचा प्रयत्न करत असल्याचे सत्ताधारी व विरोधी गटांत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. एकमेकांविरोधात शाब्दिक चकमक झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com