
Mahabaleshwar News : पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज राजभवन महाबळेश्वर येथे राज्यपाल रमेश बैस यांची सदिच्छा भेट घेतली. दौलतनगर येथील विकास कामाची पाहणी करण्यासाठी राज्यपाल श्री. बैस यांना निमंत्रण दिले. तसेच राज्यात शासन आपल्या दारीचा सातारा पॅटर्न राबविण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिली.
यावेळी पालकमंत्री श्री. देसाई Shambhuraj Desai यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर, पाचगणी, तापोळा येथे पर्यटन विकासासाठी सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली. तसेच जिल्ह्यातील आणि लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना दौलतनगर (ता. पाटण) परिसरात सुरू असलेल्या विकास कामांचीही माहिती दिली.
दौलतनगर येथील विकास कामाची पाहणी करण्यासाठी राज्यपाल श्री. बैस यांना निमंत्रण दिले. तसेच जिल्ह्यात सुरू असलेल्या शासन आपल्या दारी या उपक्रमातून 27 हजार लाभार्थ्यांना लाभ दिला असून राज्यात ही शासन आपल्या दारीचा सातारा पँटर्न राबविण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिली.
राज्यपाल रमेश बैस यांनी आज सहकुटुंब श्री क्षेत्र महाबळेश्वरचे दर्शन घेतले. यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष कार्य अधिकारी महेश गोलाणी, अप्पर जिल्हाधिकारी तथा राज्यपालांचे परिवार प्रबंधक अरुण आनंदकर, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार तेजस्विनी पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी राज्यपाल श्री. बैस यांनी पंचगंगा मंदिर दर्शन घेऊन कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री व गायत्री नदीच्या उगमस्थानास भेट दिली. तसेच श्री महाबळेश्वरची अभिषेक पूजा केली. त्यानंतर कृष्णाई मंदिरास भेट देऊन तेथील इतिहास जाणून घेतला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.