Solapur Politic's : पालकमंत्री गोरेंची मैत्री, कल्याणशेट्टींचा पाठिंबा कामी आला अन्‌ दिलीप मानेंनी पुन्हा बाजी मारली!

Solapur Bazar Samiti Sabhapatil Election : एका बड्या संचालकाने सभापतिपदासाठी लॉबिंग केल्याची चर्चा आहे. सभापतिपदासाठी आपल्या नावाचा आग्रह करावा, असे त्यांनी काही संचालकांना सांगितल्याची माहिती आहे.
Sachin Kalyanshetti-Dilip Mane-Jaykumar Gore
Sachin Kalyanshetti-Dilip Mane-Jaykumar GoreSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 11 may : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी माजी आमदार दिलीप माने यांची, तर उपसभापतिपदी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे समर्थक संचालक सुनील कळके यांची बिनविरोध निवड झाली आहे. ह्या निवडी बिनविरोध झाल्या असल्या तरी पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडल्याची माहिती आहेत. सुरेश हसापुरे हे पहिली दोन वर्षे सभापतिपद आपल्याला मिळावे, यासाठी आग्रही होते. मात्र पालकमंत्री जयकुमार गोरेंशी असलेली मैत्री कामी आली आणि कल्याणशेट्टी यांनीही आपले वजन मानेंच्या पारड्यात टाकल्याने दिलीप मानेंनी बाजी मारली.

अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane), सुरेश हसापुरे आणि राजशेखर शिवदारे यांनी सोलापूर बाजार समितीची निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत सहकारी सोसायटी मतदारसंघातील माने-हसापुरेंच्या भक्कम तटबंदीमुळे कल्याणशेट्टींच्या नेतृत्वाखालील पॅनेलने १८ जागांपैकी १३ जागा जिंकत बाजार समितीवर सत्ता मिळविली.

बाजार समितीवर सत्ता आलेल्या कल्याणशेट्टी, माने, हसापुरे पॅनेलमध्ये सभापतिपदासाठी जोरदार रस्सीखेच दिसून आला. माजी आमदार दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांच्यात चुरस दिसून आली. सुरेश हसापुरे (Suresh Hasapur) हे पहिले दोन वर्षे सभापतिपद आपल्याला मिळावे, यासाठी आग्रही होते, असे सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे मानेंचा पॅनेल बनवितानाच सभापतिपदावर क्लेम होता. त्यामुळे कल्याणशेट्टी आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यापुढे पेच निर्माण झाला.

Sachin Kalyanshetti-Dilip Mane-Jaykumar Gore
Solapur Bazar Samiti : सोलापूर बाजार समितीच्या सभापतिपदी दिलीप माने; उपसभापतिपद कल्याणशेट्टी समर्थकाकडे, दोन वर्षांसाठी असणार नियुक्ती

दिलीप माने यांची जयकुमार गोरेंशी असलेली मैत्री या वादात कामाला आली. तसेच, कल्याणशेट्टी यांनीही पहिल्या दोन वर्षांसाठी मानेंच्या पारड्यात टाकले. त्यामुळे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिलीप माने यांचे नाव जाहीर करण्यात आले. यात पालकमंत्री जयकुमार गोरेंची भूमिका महत्वपूर्ण ठरली. त्यातूनच माने यांचा सभापतिपदाचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हसापुरे यांना सभापतिपदासाठी आणखी दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दरम्यान, एका बड्या संचालकाने सभापतिपदासाठी लॉबिंग केल्याची चर्चा आहे. सभापतिपदासाठी आपल्या नावाचा आग्रह करावा, असे त्यांनी काही संचालकांना सांगितल्याची माहिती आहे. पण त्यांना संचालकांकडून तेवढा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतींच्या निवडी बिनविरोध झाल्या असल्या तरी त्यामागे अनेक राजकीय घडामोडी घडल्याचे समोर येत आहे.

Sachin Kalyanshetti-Dilip Mane-Jaykumar Gore
Dilip Mane : दिलीप मानेंनी सांगितला मुख्यमंत्री फडणवीसांसमोर ठरलेला सभापतिपदाचा फॉर्म्युला....

सभापती-उपसभाती निवडीसाठी विरोधी पॅनेलचे तीनही संचालक उपस्थित होते. मनीष देशमुख यांनी तर माजी आमदार दिलीप माने यांचा सत्कार केला. मात्र, सत्ताधारी गटातील राजशेखर शिवदारे यांची अनुपस्थिती लक्षवेधी ठरली. त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा आज दिवसभर होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com