620 Acres Land Purchase : गुजरातमधील अधिकाऱ्याने बळकावलं महाराष्ट्रातील गाव, साताऱ्यात घेतली 620 एकर जमीन?

Gujarat Gst Commissioner : गुजरातच्या जीएसीटी आयुक्तांनी, त्याच्या कुटुंबीयांनी, नातेवाईकांनी असे एकूण 13 जणांनी झाडाणी (ता.महाबळेश्वर) हे संपूर्ण गावचं खरेदी केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
620 Acres Land Purchase
620 Acres Land Purchase sarkarnama

Satara News : चार पाच नव्हे तर तब्बल 620 एकर जमीन गुजरातमध्ये जीएसीटीचे मुख्य आयुक्त पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर मधील दुर्गम कांदाटी खोऱ्यात घेतल्याची माहिती माहिती अधिकारातून पुढे आली आहे. या संदर्भात माहिती अधिकारी कार्यकर्ता सुशांत मोरे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

620 Acres Land Purchase
Gajanan Kirtikar News : शिंदेंच्या दोन शिलेदारांत जुंपली; वायकरांना म्हणाले, 'हे दोन महिन्यापूर्वींच प्रॉडक्ट...'

नंदूरबारचा रहिवाशी असलेले आणि सध्या अहमदाबाद, गुजरात येथे जीएसटी GST मुख्य आयुक्त असणारे चंद्रकांत वळवी यांनी कंदाटीतील 640 एकर जमीन बळकावल्याचा आरोप सुशांत मोरे यांनी केला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनातील कारवाई करण्याची मागणी देखील मोरे यांनी केली आहे. गुजरातच्या Gujarat जीएसीटी आयुक्तांनी, त्याच्या कुटुंबीयांनी, नातेवाईकांनी असे एकूण 13 जणांनी झाडाणी (ता.महाबळेश्वर) हे संपूर्ण गावचं खरेदी केले आहे. यातून तेथील 620 एकराचा भूखंड बळकावला आहे , असे देखील मोरे यांनी म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पर्यावरणदृष्या हा भाग अतिशय संवेदनशील आहे. झाडाणी हे गाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राच्या नजीकच वसले आहे. याठिकाणी घनदाट जंगल असल्याने येथे वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास आहे. पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, 1986, वन (संरक्षण) अधिनियम, 1976 व वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 सारख्या अनेक महत्त्वपूर्ण कायद्यांचे राजरोसपणे नियमित उल्लंघन होत आहे, हे चिंतेचे विषय आहे. या कायद्यांचे उल्लंघन नैसर्गिक संपत्ती आणि पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण करते, असे देखील मोरे म्हणाले.

रिसॉर्ट बांधकामावर कारवाई करा

येथे तब्बल 35 एकर रिसाॅर्टचे बांधकाम सुरु आहे. या अनधिकृत बांधकामावर कारवाई करा,अनधिकृत बांधकाम प्रकरणी शासकीय यंत्रणेतील संबंधित प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी ओळखून काम केले तर सह्याद्रीतील अनधिकृत बांधकामांना व ती उभारण्यास मदत करणाऱ्यांना चाप बसेल, असे मोरे म्हणाले तसेच कारवाई झाली नाही तर 10 जूनपासून उपोषद करणार असल्याचा इशारा देखील मोरे यांनी दिला.

(Edited By Roshan More)

620 Acres Land Purchase
Shantigri Maharaj News : मतदानानंतर काही तासांतच शांतिगिरी महाराजांना मोठा धक्का; नाशिकमध्ये 'या' प्रकरणी गुन्हा दाखल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com