Shantigri Maharaj News : मतदानानंतर काही तासांतच शांतिगिरी महाराजांना मोठा धक्का; नाशिकमध्ये 'या' प्रकरणी गुन्हा दाखल

Nashik Loksabha Election Voting : नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी सोमवारी त्र्यंबकेश्वर येथील मतदान केंद्रावर मतदान केले.
Shantigri Maharaj News
Shantigri Maharaj NewsSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election News 2024 : देशासह महाराष्ट्रातही लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी (ता.20)मतदान होत आहे. यात देशात 49 मतदारसंघासह राज्यातील नाशिक, दिंडोरी, मुंबईतील 6 अशा एकूण अकरा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यातच नाशिक लोकसभा निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवणार्या शांतिगिरी महाराजांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. (Nashik Loksabha Election 2024)

नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांविरोधात (Shantigiri Maharaj) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी सोमवारी त्र्यंबकेश्वर येथील मतदान केंद्रावर मतदान केले.यावेळी त्यांनी मतदान यंत्रालाच हार घातला.तसेच यंत्राला नमस्कार करून मंत्रही म्हटले.आता महाराजांवर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shantigri Maharaj News
Jitendra Awhad News: राजकीय मैदानात आणखी विकेट घेणार; CM शिंदेंच्या वक्तव्यावर आव्हाडांचं प्रत्युत्तर म्हणाले, "कोणाच्या विकेट पडतील..."

नाशिक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज विविध कारणांनी चर्चेत आहेत. आज त्यांनी तसेच त्यांच्या अनुयायांनी निवडणूक नियमांचा भंग केला.आज सकाळी अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी आपले पंचवीस ते तीन सहकाऱ्यांसह मतदान केंद्र क्रमांक 205 येथे जाऊन मतदान केले.

यावेळी त्यांनी विनापरवाना मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेला होता. सबंध मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण केले. मतदानानंतर मतपेटीला हार घातला. त्यामुळे निवडणूक कर्मचारी आणि केंद्र अध्यक्षांची चांगलीच धावपळ उडाली. त्यांनी शांतिगिरी यांना परावर्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र अन्य कशाचाही विचार न करता शांतिगिरी यांनी मतदान यंत्राला हार टाकला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. याबाबतची माहिती मिळाल्याने तहसीलदारांच्या सूचनेवरून त्र्यंबकेश्वर पोलिसांनी शांतिगिरी महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाशिक मतदारसंघात मतदान सुरू होते. यावेळी अंबड परिसरात सात ते आठ नागरिक भगवे वस्त्र धारण करून घोषणा देत होते. शांतिगिरी महाराज यांना मतदान करा, असे आवाहन करत होते. त्यांच्या कपड्यांवर 'जय बाबाजी' असे शब्द लिहिलेले होते. तसेच शांतिगिरी महाराज यांची निवडणूक निशाणी बादली हे चित्र देखील लावण्यात आले होते. त्यामुळे हे कार्यकर्ते चर्चेचा विषय ठरले.

अंबड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडे याबाबतची माहिती मिळाल्यावर त्यांनी संबंधित कार्यकर्त्यांची चौकशी केली. मतदानाच्या दिवशी अशा प्रकारे प्रचार करणे आणि उमेदवाराचे चिन्ह लावून फिरणे हा नियमांचा भंग आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आल्यानंतर भागवत निंबा कदम, संदीप श्रावण पाटील, विष्णू कारभारी साखड आणि पांडुरंग बाबुराव सदगीर या चार जणांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची चौकशी केल्यानंतर आणि निवडणूक नियमांची माहिती दिल्यानंतर प्रशासन तसेच राजकीय नेत्यांच्या दबावामुळे समज देऊन त्यांना सोडण्यात आले.

Shantigri Maharaj News
Lok Sabha Election Voting Updates : सहा तासानंतर महाराष्ट्रात निरुत्साह; 30 टक्केही मतदान नाही

अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज गेल्या तीन चार दिवसांपासून अचानक चर्चेत आले आहेत. त्यांनी आपल्याला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा असल्याचे विधान केले होते. त्यानंतर सर्व हिंदुत्ववादी संघटना आपल्या पाठीशी असून आपणच खरे हिंदुत्ववादी उमेदवार आहोत, असेही त्यांनी सांगितले होते. सध्या सोशल मीडियावर त्यांनी महायुतीच्या उमेदवारांचा व मतदारांचा गोंधळ होईल अशा पोस्ट वायरल केल्या आहेत. त्यामुळे नाशिक मतदारसंघाचे निवडणूक शांतिगिरी महाराज यांच्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

याअगोदर पुण्यात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी मतदान केंद्रावर ईव्हीएम मशिनची पूजा केली होती.त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Shantigri Maharaj News
Lok Sabha Election 2024 Voting : पवईतील मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद, ठाकरे गटाचे आदेश बांदेकर संतापले

नाशिक लोकसभा निवडणुकीत शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुन शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे (शिंदे गट) आणि शिवसेना राजाभाऊ वाजे (ठाकरे गट) या दोन उमेदवारांसमोर तगडं आव्हान उभं केलं आहे. त्यांनी विजयाचा दावा ठोकतानाच आपल्याला भाजपचा पाठिंबा असल्याचा दावा करुन एकच खळबळ देखील उडवून दिली होती.

(Edited By Deepak Kulkarni)

Shantigri Maharaj News
Gajanan Kirtikar News : गजाभाऊ किर्तीकर आम्हाला सोडून जाणं, हे फार वेदनादायी होतं : शिवसेना खासदाराने बोलून दाखवली व्यथा

शांतिगिरी महाराजांच्या सहकाऱ्यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसह अन्य भागातील मतदान केंद्रांना भेटी दिल्या. मतदानाविषयी माहिती घेतली. नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा आहेत. दिंडोरी मतदारसंघात मतदानासाठी विशेष उत्साह दिसून आला. दोन्ही मतदारसंघात सकाळी नऊ पर्यंत सहा टक्के मतदान झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com