गुलाबराव पाटील म्हणाले, निलेश राणे हे आमचं प्रोडक्ट...

राज्याचे सार्वजनिक पाणी पुरवठा विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील ( Gulabrao Patil ) यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राणे पिता-पुत्रांवर जोरदार टीका केली.
 Gulabrao Patil
Gulabrao PatilSarkarnama

अहमदनगर - पारनेर तालुक्यातील अळकुटी येथे शिवसेनेचे मेळावा झाला. मेळाव्यानंतर राज्याचे सार्वजनिक पाणी पुरवठा विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील ( Gulabrao Patil ) यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राणे पिता-पुत्रांवर जोरदार टीका केली. ( Gulabrao Patil said, Nilesh Rane is our product ... )

निलेश राणे यांनी काल (शुक्रवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. या संदर्भात पत्रकारांनी गुलाबराव पाटील यांनी विचारले असता ते म्हणाले, भाजपचे निलेश राणे हे आमचं प्रॉडक्ट आहे. हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नसते तर राणे पिता-पुत्र कुठेच नसते अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली.

 Gulabrao Patil
मीही कोरोना सेंटर काढले होते पण कधी प्रसिद्धी केली नाही

ते पुढे म्हणाले की, सध्या राज्यामध्ये केंद्रीय यंत्रणांचा मोठा दुरुपयोग होत आहे. सत्तेमधील मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या नातेवाईकांवर कारवाया होत आहे. हे चुकीचे असून विरोधकांनी विकासाच्या राजकारणावर बोलले पाहिजे मात्र तसे होताना दिसत नाही. उत्तर महाराष्ट्र आणि खान्देशला एकनाथ खडसे यांच्या रूपाने मुख्यमंत्री मिळाला असता. मात्र खडसे नीट राहिले नाही. त्यामुळे संधी हुकली, असाही टोला त्यांनी लगावला.

 Gulabrao Patil
सुजय विखेंचा जवळचा कार्यकर्ता शंकरराव गडाख, औटी यांनी फोडला...

आमदार नीलेश लंकेंना टोला

शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना गुलाबराव पाटील यांनी आमदार नीलेश लंके यांच्या कोविड सेंटरमधील कामाचीही फिरकी घेतली. ते म्हणाले, शिवसेनेने कोरोना काळात सर्वाधिक काम केले. मीही कोरोना सेंटर चालविले होते. मात्र कधी या कामाची प्रसिद्धी केली नाही. काहींनी कोविड सेंटर काढून त्याची वर्तमानपत्रे व न्यूज चायनलमधून प्रसिद्धी केली. माझं बघं माझं बघं म्हणण्याची काहीही गरज नाही. सेवा करायची असेल तर सांगायची नसते. दान करायच असतं बोलायच नसतं, असा टोलाही त्यांनी आमदार नीलेश लंके यांचे नाव न घेता लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com