Nashik News : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांचे भाषण नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. त्यांच्या तडाकेबाज भाषणाने शिवसैनिकांना भुरळ पडते. अशातच आज शिवसेनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात गुलाबराव पाटील यांचे हाय व्होल्टेज भाषण पाहायला मिळाले. खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत त्यांनी केलेली फटकेबाजी अधिवेशनात चर्चेचा विषय बनला आहे. (Latest Marathi News)
गुलाबराव पाटील म्हणाले, "सर्व जाती-धर्मातल्या लोकांना सोबत घेऊन जाणारे बाळासाहेबांचे हिंदुत्व होतं. मात्र, काहींनी त्यांच्याबद्दल अपप्रचार केला आहे. बाळासाहेबांनी सर्वसामान्य लोकांना मोठं केलं आहे. बाळासाहेबांनी स्वतः कधीही पद घेतलं नाही, पण त्यांचा वारसा कोणी संपवला, यावर मी बोलणार नाही, असे सांगत राम मंदिर व्हावं हे बाळासाहेबांचे स्वप्न होतं. बाळासाहेबांचे स्वप्न मोदींनी पूर्ण केलं आणि म्हणूनच एकनाथ शिंदेंनी त्यांची विचारधारा स्वीकारून उठाव केला."
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"ज्या काँग्रेसला शिव्या देण्यात आमचं आयुष्य गेलं. ज्या काँग्रेसने आमची बरबादी केली. मात्र, बाळासाहेबांच्या खऱ्या वारसदारांनी त्याच काँग्रेससोबत 'आय लव्ह यू' केलं. ज्यांनी शिवसेनेला जिवंत ठेवलं, त्यांचं नाव एकनाथ शिंदे आहे. आम्ही उठाव केल्यानंतर आमच्यावर टीका झाली. आमच्यावर पन्नास खोक्यांची टीका झाली, पण अजित पवार इकडे आल्यानंतर खोक्याची टीका बंद झाली, असे अजित पवार म्हणाले.
"काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) आय लव्ह यू म्हणत इकडे आलेत. जळगावला आलो होतो. साहेबांचं पिल्लू काल जळगावला आले होते. त्यावेळी फक्त 500 लोक होते. गर्दी तुमच्यामुळे होत नव्हती. आम्ही रक्ताचं पाणी करून ती जमवत होतो," अशा शब्दांत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर गुलाबराव पाटील यांनी टीका केली.
"92 ची घटना घडली, त्यावेळी आम्ही तिघे भाऊ आणि आमचा बाप आम्ही त्यावेळी जेलमध्ये होतो. तेव्हा संजय राऊत (Sanjay Raut) नावाचं कार्टून जन्माला आलं नव्हतं. आमची 41 मते या सोट्यांनी घ्यायची आणि खासदार व्हायचं. आमच्याच नावाने बोंबलायचं, असा घणाघात गुलाबराव पाटील यांनी केला.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.