
Solapur News : गुणरत्न सदावर्ते हे कायमच वादाच्या केंद्रस्थानी असतात. आता सदावर्ते यांच्या परिषेदेत नथुराम गोडसे (Nathuram Godse) यांचा फोटो पाहायला मिळाला. 'नथुराम गोडसेबाबत जी ट्रायल झाली. त्यामध्ये नथुराम गोडसेला न्याय मिळाला नाही. हिंदुस्थानी आहोत, लपून लपून स्टेट्स ठेवणारे जिहादी नाही आहोत. नथुराम गोडसे आणि अखंड भारताचा विचार आम्ही कायम लक्षात ठेवणार, असं सदावर्ते यांनी ठणकावून सांगितले. आज सोलापूर शहरात ते बोलत होते. (Latest Marathi News)
अखंड भारत आणि नथुराम गोडसेचे यांचे फोटो दाखवत सदावर्ते यांनी जयघोष केला. यावेळी बोलताना त्यांनी विरोधीपक्षनेते अजित पवारांवर टिका केली. सदावर्ते म्हणाले, "अजित पवार हे कोणत्या बँकेमध्ये नोकरीला होते? अभियंता होते की डॉक्टर होते की माझ्यासारखे वकील होते? कुणी काही चुकीचं करत असेल तर, त्यावर तपास यंत्रणांना कारवाई करण्याचा अधिकार आहे."
सदावर्ते पुढे म्हणाले, "माझी पत्नी जयश्री पाटलांनी जशी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात केस चालवली तशी याही पुढे वेळ पडली तर चालवू. देशमुखाप्रमाणे बाकीच्यांनीही जेलमध्ये राहण्याची सवय करून घ्यावी, असा ईशाराही त्यांनी यावेळी दिला.
आम्ही सच्चे हिदुस्थानी आहोत लपून लपून स्टेट्स ठेवणारे जिहादी नाही आहोत. नथुराम गोडसे आणि अखंड भारताचा विचार आम्ही कायम लक्षात ठेवणार, असे ही गुणरत्न सदावर्ते म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांच्या 7 वा वेतन आयोग आणि विलीनीकरण एकवेळेसच जाहीर होईल, याचा विश्वास आहे. पंतप्रधान मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्य विकासाच्या मार्गावर अग्रक्रमाने पुढे जातं आहे, असे सदावर्ते म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.