BJP News : भाजप पक्षश्रेष्ठींकडून पदाधिकाऱ्यांना कडक इशारा; युतीतले वाद टाळण्यासाठी आचारसंहिता लागू...

Devendra Fadnavis News : शिवसेना आणि भाजपची अडचण होईल असं काही..
Devendra Fadnavis News :
Devendra Fadnavis News :Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मागील काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना नेत्यांच्या विधानांवरून युतीमध्ये रणकंदन माजले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या जाहीरातीमुळे युतीमधला ताण-तणाव आणखीनच वाढला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर शिवसेना-भाजपमधली ही तणावाची परिस्थिती निर्माण निवळली गेली. (Latest Marathi News)

Devendra Fadnavis News :
Nagpur Congress News : राष्ट्रवादी काॅंग्रेस सतत तीन वेळा अपयशी, हिंगण्यावर कॉंग्रेसने ठोकला दावा !

मात्र असे प्रकार पुन्हा भविष्यात घडता कामा नये, यासाठी भाजप आणि शिवसेनेने आपापल्या पातळीवर खबरदारी घेण्यात आले होते. शिवसेना आणि भाजप यांच्यात वाद निर्माण होऊ नयेत यासाठी पक्षश्रेष्ठींकडून मौखिक आचारसंहिता म्हणजे बोलण्यावर- माध्यमांशी संवाध साधताना काळजी घेण्याचे सुचविले आहे.

Devendra Fadnavis News :
Akola Farmers News : बियाणांसाठी शिवसेना आक्रमक, कृषी अधिकाऱ्याच्या दालनातच केली घोषणाबाजी...

कशी आहे आचारसंहिता ?

राज्यभरात कुठेही फ्लेक्स - होर्डिंग्ज लावताना पक्षाच्या राज्य कार्यकारिणीतील पदाधिकारी, तसेच प्रदेशाध्यक्ष असतील, जिल्हा पातळीवरचे पदाधिकारी असतील, त्यांच्या पक्षाची परवानगी घेणे, सक्तीचं करण्यात आले आहे. माध्यमांशी संवाद साधतांना पक्षाकडून नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांशिवाय, कुणीहा माध्यमांशी बोलणार नाही, अशी तंबीच पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. शिवसेना आणि भाजपची अडचण होईल, असे वक्तव्ये टाळण्याची ताकीद देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com