Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या घोषणांमुळे गुरुजी खुशीत

Sambhajirao Thorat महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या संभाजीराव थोरात गटाने रत्नागिरीत जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
Sambhajirao Thorat, Eknath Shinde
Sambhajirao Thorat, Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri News : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या संभाजीराव थोरात Sambhajirao Thorat गटाची शिक्षण परीषद व शिक्षक मेळावा रत्नागिरीत झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath shinde यांनी या मेळाव्यात शिक्षकांच्या मागण्याबाबत केलेल्या घोषणामुळे राज्यातील प्राथमिक शिक्षक खुशीत आहेत.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या संभाजीराव थोरात गटाने रत्नागिरीत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. चंपक मैदानावर झालेल्या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते.

यावेळी शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांनी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यासह मुंबईत शिक्षक भवनासाठी जागा मागितली. शिक्षकांवरील अतिरिक्त काम कमी करण्याची मागणी केली. राज्यात शिक्षकांची ताकत मोठी आहे. विद्यार्थ्यांना शिक्षक हे सरकार लयभारी आहे म्हटलं तर विद्यार्थीही घरात जाऊन सरकार लय भारी म्हणतील, अशी मिश्किल टिपणी केली.

Sambhajirao Thorat, Eknath Shinde
Ratnagiri News : उदय सामंतांचे डावपेच उडविणार ठाकरे गटातील नेत्यांची झोप

त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही शिक्षकांच्या मागण्या मान्य करतो पण तेवढं सरकार लयभारी आहे असं सांगा अशी वक्तव्य केल्याने हशा पिकला. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात समिती स्थापन करू, शिक्षक भवनही करू अशी घोषणा केली. शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत संभाजीराव थोरात यांच्या सोबत बैठकही आयोजित करू असेही सांगितले. त्यामुळे प्राथमिक शिक्षक खुशीत आहेत.

Sambhajirao Thorat, Eknath Shinde
Satara : हा तर सत्याचा, न्यायाचा विजय; बाळासाहेबांचा आशीर्वाद मिळाला : देसाई

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com