Harshvardhan Patil and Pakistan Occupied Kashmir : भाजपाचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांनी कोल्हापूरच्या इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाची तुलना थेट पाक व्यक्त काश्मीरशी केली आहे. यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत. हर्षवर्धन पाटील यांचं हे विधान त्यांना आणि भाजपसाठी डोकेदुखी वाढवणार ठरणार असल्याचं दिसत आहे.
धैर्यशील माने(Dhairyasheel Mane) यांनी पाकव्याप्त काश्मीरसारख्या इचलकरंजीमधून विजयाचा दिवा लावला, अशाप्रकारचं वादग्रस्त विधान सांगलीच्या वाळवा मध्ये त्यांनी केलं आहे. क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या जयंती समारंभामध्ये ते बोलत होते. या लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने हे निवडून आले आहेत आणि त्यांच्या निवडीचे अभिनंदन करताना हर्षवर्धन पाटलांनी इचलकरंजीला थेट पाकव्याप्त काश्मीर म्हणून उपमा दिल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
'इचलकरींचा लोकसभेचा मतदारसंघ, तसं पाहीलं तर पाकव्याप्त काश्मीर असं म्हणायला पाहीजे. कारण, आजूबाजूला सगळी वादळं वेगळी होती. आजूबाजूने सगळ्या शक्ती काही अदृश्य असतील काही बदलत असतील. पण या सगळ्या शक्ती आणि या सगळ्या प्रतिकुल परिस्थितीत सुद्धा खऱ्या अर्थाने या वावटळातही ज्यांनी दिवा लावला, त्या धैर्यशील मानेंचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांना मनापासून शुभेच्छा देतो.' असं हर्षवर्धन पाटील(Harshvardhan Patil) यांनी म्हटलेलं आहे.
यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील मोठमोठे बुरुज ढासळले, मात्र आपण वादळात दिवा लावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण निवडणूक लढवली आणि ती यशस्वी करुन दाखवली, असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील माने यांनी केलेलं आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.