Dhairyasheel Mane : पावसात 'मशाल' विझली, पण आपण वादळात...; धैर्यशील माने ठाकरे गटावर बरसले

Hatkanangle Lok Sabha Constituency Dhairyasheel Mane On Shivsena Thackeray Group : "मतमोजणीच्या दिवशी निकालाआधी जे गुलालात रंगले, ते जोतिबाला जाऊन आले म्हणून बाहेर सांगत होते. कारण कोणी विचारलं गुलाल कोणाचं लावला तर उत्तर काय देणार?"
Dhairyasheel Mane
Dhairyasheel Mane Sarkarnama
Published on
Updated on

Dhairyasheel Mane On Shivsena Thackeray Group : यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील मोठमोठे बुरुज ढासळले, मात्र आपण वादळात दिवा लावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण निवडणूक लढवली आणि ती यशस्वी करुन दाखवली, असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील माने यांनी केलं. ते शिराळा येथील एका सत्कार सोहळ्यात बोलत होते.

या सोहळ्यात बोलताना खासदार माने यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. मतमोजणीच्या दिवशी निकालाआधी गुलाल लावून फिरणाऱ्यांना निकालानंतर जोतिबाला जाऊन आलो असं खोटं बोलावं लागलं, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) म्हणाले, "मतमोजणीच्या दिवशी दुपारपर्यंत विरोधक गुलाल लावून फिरत होते. त्यामुळे आम्हाला काही कळत नव्हतं. मतमोजणीच्या काही फेऱ्या बाकी होत्या. त्याच्या आधीच ते मशाल पेटली म्हणून सांगत होते.

मात्र, संध्याकाळी पाऊस पडला आणि मशाल विझून गेली. हे सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं. शिवाय जे गुलालात रंगले, ते जोतिबाला जाऊन आले, म्हणून बाहेर सांगत होते. कारण कोणी विचारलं गुलाल कोणाचं लावला तर उत्तर काय देणार?" अशा शब्दात त्यांनी ठाकरे गटाला टोला लगावला.

Dhairyasheel Mane
Jarange Vs Bhujbal : "भुजबळांना थोड्या दिवसांत जनावरांचं इंजेक्शन अन् गोळ्या घ्याव्या लागणार"

तसंच आपल्या पाठीशी कोणतीही ताकद नसताना ही निवडणूक जिंकल्याचंही खासदार माने म्हणाले. आपल्याकडे कोणतीही ताकद नसताना, कारखाना, सुतगिरण्या दुधसंघ नसतानादेखील सामान्यांची असमान्य ताकद कशी उभी राहते आणि निवडणूक कशी जिंकता येते हे आपण दाखवून दिलं.

सुरुवातीपासून माझा रिपोर्ट नेगेटीव्ह होता पोलमध्ये मी कुठे दिसत नव्हतो, मात्र तरीही मी निवडणून आलो. ही निवडणूक म्हणजे मटका नव्हता तर देश कोणाच्या हातात द्यायचा याचा निर्णय होता आणि या मतदारसंघातील लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हातात देश दिला, असं ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com