Harshvardhan Patil Video : तीन दिवसातच हर्षवर्धन पाटील करणार एक घाव दोन तुकडे, भाजप की तुतारी?

Harshvardhan Patil elections NCP Sharad Pawar BJP : काही कार्यकर्ते म्हणत आहेत की भाजपला इंदापूरची जागा सुटत आहे का ते पाहा पण तुम्ही निवडणूक लढा, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
Harshvardhan Patil
Harshvardhan PatilSarkarnama
Published on
Updated on

Harshvardhan Patil : भाजप नेते हर्षवर्धन पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. पितृपक्ष पंधरवडा संपताच पदाधिकाऱ्यांशी बोलून जनतेच्या मनातील निर्णय घेणार, असे हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केला आहे.

कार्यकर्त्यांचा तुतारीचा आग्रह आहे. मात्र, सर्वांचा विचार करूनच लोकांशी चर्चा करून तुतारीवर लढायचे की अपक्ष त्याचा निर्णय पितृपंधरवडा संपल्यानंतर निर्णय घेणार, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.

काही कार्यकर्ते म्हणत आहेत की भाजपला इंदापूरची जागा सुटत आहे का ते पाहा पण तुम्ही निवडणूक लढा, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये आहेत. तर, इंदापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दत्तात्रेय भरणे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला जाणार हे निश्चित आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचे समर्थक हर्षवर्धन पाटील यांनी निवडणूक लढावी म्हणून आग्रही आहेत.

Harshvardhan Patil
Ajit Pawar News : अजितदादांचं मोठं विधान; म्हणाले, 'केंद्रात आपला जावई...'

हर्षवर्धन पाटील म्हणाले, आम्ही लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांचे प्रश्न ऐकण्यासाठी प्रत्येक गट गणानुसार बैठका घेत आहोत. शनिवारी मी शेवटची बैठक घेतली आहे. त्यामध्ये देखील लोकांनी निवडणूक लढण्याचा आग्रह धरला.

...तर पाटील अपक्ष लढणार?

हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जात तुतारीवर निवडणूक लढण्याचा आग्रह केला जातो आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लढण्याची इच्छा प्रवीण माने यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या काही समर्थकांकडून अपक्ष लढण्याचा आग्रह धरला जातो आहे.

Harshvardhan Patil
Jharkhand Assembly Election and BJP : झारखंड निवडणुकीसाठी 'NDA' आघाडीचं ठरलं; भाजप 'या' पक्षांसोबत एकत्र निवडणूक लढवणार!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com