Hasan Mushrif : 'बिद्री' कशाला, के. पी. पाटलांच्या घरावरच छापे टाका; हसन मुश्रीफांचा संताप, नेमके काय म्हणाले?

K. P. Patil Bidri Sugar Factory : बिद्री कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या या कारवाईचा हसन मुश्रीफांनी निषेध केला.
Hasan Mushrif, K P Patil
Hasan Mushrif, K P PatilSarkarnama

Kolhapur Political News : कोल्हापूरमधील माजी आमदार के. पी. पाटील हे महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आणि त्यांच्या बिद्री सहकारी साखर कारखान्यावर छापा टाकण्यात आला आहे. यावर शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहिलो, हा माझा गुन्हा आहे का? असा प्रश्न के. पी. पाटलांनी उपस्थित केला. त्यांची साथ देत मंत्री हसन मुश्रिफ यांनीही सरकारला घरचा आहेर दिला आहे.

बिद्री कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या या कारवाईचा हसन मुश्रीफांनी निषेध केला. ते म्हणाले, के. पी. पाटील हे फक्त महाविकास आघाडीकडे जाणार म्हणून कारवाई केली असेल तर ते चुकीचे आहे.

तसे असेल तर त्यांच्या घरावरच ईडी किंवा इन्कम टॅक्सची धाड टाकायला हवी होती. मात्र 65 हजार सभासद असलेल्या कारखान्यावर केलेली कारवाई पटण्यासारखी नाही, असे खडेबोल उत्पादन शुल्क विभागाच्या मंत्र्यांना मुश्रीफांनी सुनावले.

हसन मुश्रीफ नेमके काय म्हणाले?

के. पी. पाटील अध्यक्ष असलेल्या बिद्री कारखान्यावर केलेल्या कारवाईचा निषेध करतो. ते फक्त महाविकास आघाडीकडे जाणार असल्याच्या चर्चेतून ही कारवाई होत असेल तर त्यांच्या घरावरच ईडी किंवा इन्कम टॅक्सचा छापे टाकावेत. अशा पद्धतीने 65 हजार सभासदांच्या मालकीच्या कारखान्यावर कारवाई करणे चुकीचे आहे, असे स्पष्ट भूमिका मांडत मुश्रीफांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

हा कारखाना के. पी. पाटील यांच्या मालकीचा नसून 65 हजार सभासदांचा आहे. या कारखान्यावर छापे टाकून राजकारणात यशस्वी होता येणार नाही. या कारवाईमुळे के. पी. पाटलांना जास्त सहानुभूती मिळेल.

या पद्धतीने एखाद्या सहकारी कारखान्याला घालवणे बरोबर नाही. त्यामुळे संबधित विभागाच्या मंत्र्यांशी बोलणार असल्याचेही मुश्रीफांनी स्पष्ट केले. व्यक्तिगत कारवाई करायची असेल तर त्यांच्या घरावर करावी, असाही संताप मुश्रीफांनी व्यक्त केला.

Hasan Mushrif, K P Patil
MLA Kapil Patil : तुम्हाला उमेदवारी देऊन चूक झाल्याची उद्धव ठाकरेंना जाणीव; कपिल पाटलांचा अभ्यंकरांना टोला, काय आहे प्रकरण?

के. पी. पाटलांचं म्हणणं काय ?

लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्याच उमदेवाराचा प्रचार केला आहे. मात्र जनतेने निवडणूक हातात घेतली होती. माझ्या गावी खासदार शाहू महाराज आले, त्यांचे स्वागत केले. मी शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलनात सहभागी होऊन शेतकऱ्यांची बाजू घेतली हा गुन्हा केला का?

आताच्या कारवाईत फारसं काहीही मिळालेले नाही. याबाबत अजितदादांना सांगितलेले नाही. मी कुठल्याही वाटेवर नाही. आता मात्र शांत बसणार नाही, असे म्हणत के. पी. पाटलांनी विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Hasan Mushrif, K P Patil
ShivsenaUBT Vs Congress : 'पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचा म्हणणाऱ्या विशाल पाटील- कदमांना ठाकरे गटानं झापलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com