ShivsenaUBT Vs Congress : 'पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचा म्हणणाऱ्या विशाल पाटील- कदमांना ठाकरे गटानं झापलं

Shivsena Political News : 'आधी किमान जागावाटप तरी होऊ द्या,येणाऱ्या काळात काहीही होऊ शकते...'
Vishwajeet kadam-Vishal Patil-Uddhav Thackeray
Vishwajeet kadam-Vishal Patil-Uddhav ThackeraySarkarnama

Shivsena UBT News : लोकसभा निवडणुकीत ठाकरेंचं आव्हान मोडून काढत अपक्ष उमेदवार विशाल पाटलांनी सांगलीत विजय खेचून आणला.यात काँग्रेसच्या विश्वजीत कदमांचा रोल महत्वाचा ठरला.पण सांगलीतील विजयाने काँग्रेसच्या या जय- वीरूचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे.

विशाल पाटलांनी तर या कॉन्फिडन्समध्ये पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल हेही ठणकावून सांगितले. यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या वक्तव्यावरुन ठाकरे गटाच्या नेत्यानं विशाल पाटलांना फटकारलं आहे.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी काँग्रेस नेते विशाल पाटील आणि आमदार विश्वजीत कदम यांना खडे बोल सुनावले आहेत.दानवे म्हणाले, आगामी काळात काहीही होऊ शकते. अद्याप विधानसभेची निवडणूक जाहीर झालेली नाही.जागावाटपाची चर्चाही सुरू झालेली नसून मुख्यमंत्री कोण होईल,हा निवडणुकीनंतरचा विषय असल्याचे सांगत कान टोचले आहे.

अंबादास दानवे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा दाखला देत काँग्रेसच्या नेत्यांवर टीका केली आहे. ते म्हणाले, गेल्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होईल,असे कुणालाही वाटले नव्हते,पण ते मुख्यमंत्री झाले.आधी किमान जागावाटप तरी होऊ द्या,येणाऱ्या काळात काहीही होऊ शकते असा दावा त्यांनी केला.

Vishwajeet kadam-Vishal Patil-Uddhav Thackeray
Shambhuraj Desai On Maratha : प्रश्न सुटण्याच्या मार्गावर, आता गालबोट...; मराठा आरक्षणावर देसाई काय म्हणाले?

'पटोले अन् कदम काय बोलतात त्याला..'

अंबादास दानवे म्हणाले, आगामी काळात महायुतीचे सरकार बदलणे जास्त महत्त्वाचे आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसची फक्त एक जागा आली होती.तो शिवसेनेचा माजी आमदार होता. मुळात काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व परिपक्व आहे. नाना पटोले किंवा विश्वजित कदम काय बोलतात, त्याला काँग्रेसमध्ये महत्त्व आहे, असे वाटत नसल्याचा टोलाही दानवेंनी यावेळी लगावला.तसेच केंद्रीय नेतृत्वाला या सगळ्या परिस्थितीची जाणीव आहे, असे दानवे यांनी सांगितले.

विशाल कदम काय म्हणाले...?

नवनिर्वाचित खासदार विशाल पाटलांनी मिरजेतील एका कार्यक्रमात 'राज्यात वसंतदादांच्या विचारांचा मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि तो सांगलीचाच असावा' अशी अपेक्षा आमदार विश्वजित कदमांपुढेच बोलून दाखवली.त्यानंतर आपल्या भाषणात डॉ. विश्वजीत कदमांनी (Vishwajieet Kadam) विशाल पाटलांच्या अपेक्षांवर भूमिका मांडली.'आगामी काळात या राज्यात काँग्रेसचाच मुख्यमंत्री पाहायला मिळेल, पण तो सांगली जिल्ह्याचा असेल का नाही हा येणारा काळ ठरवेल,' असेही कदम यांनी स्पष्ट केले.

Vishwajeet kadam-Vishal Patil-Uddhav Thackeray
Pune Porsche Car Accident Case : 'पुणे पोर्श अपघात प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालविणार' ; मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com