..म्हणून हसन मुश्रीफ यांनी मानले चंद्रकांतदादांचे `आभार`

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील कलगीतुरा नेहमीचाच
Hasan Mushrif-Chandrakant Patil
Hasan Mushrif-Chandrakant Patilsarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : ``जिल्हा बँकेच्या (Kolhapur district bank) राजकारणात बाबासाहेब पाटील-आसुर्लेकरांना सोबत घेऊ नका, अशी आमदार डॉ. विनय कोरे (Vinay Kore) यांची भूमिका होती. खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी आसुर्लेकरांना पाठिंबा दिला आणि दुसरे पॅनेल झाले. आता डॉ. कोरे काय करतील हे जर त्यांना समजत नसेल तर त्यांचे ज्ञान अगाध आहे, त्यांना जिल्ह्याचे राजकारणच कळाले नाही,`` असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना लगावला.


जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीत प्रा. मंडलिक यांनी वेगळा विचार केल्यास आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असे श्री. पाटील यांनी काल म्हटले होते. यावर श्री. मुश्रीफ यांनी आज प्रतिक्रिया दिली. तुम्हाला कागलबाहेरचे ज्ञान नाही, या टीकेवर काय सांगाल यावर श्री. मुश्रीफ म्हणाले, ‘त्याबद्दलही त्यांचाही मी आभार आहे, निदान कागलमध्ये तरी ज्ञान आहे असे ते म्हटले.’

Hasan Mushrif-Chandrakant Patil
शरद पवार आणि संजय राऊत भविष्यवेत्ते कधी झाले? चंद्रकांत पाटलांचा सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलवलेल्या कालच्या बैठकीला मुख्यमंत्री डॉक्टरांच्या सल्‍ल्यानुसार गैरहजर होते, एकीकडे कोरोना हा रोगच नाही, कोरोनामुळे काही होत नाही, लॉकडाऊन करू नका, बंधने घालू नका असे श्री. पाटील म्हणत असताना त्यांनी केलेल्या टिकेचे आश्‍चर्यं वाटते असे प्रत्युत्तर श्री. मुश्रीफ यांनी दिले.

मुख्यमंत्री पदाचा कार्यभार कोणाकडे तरी द्यावा, खासदार शरद पवार हे शॅडो मुख्यमंत्री आहेत अशीही टीका श्री. पाटील यांनी केल्याकडे त्यांचे लक्ष वेधले असता श्री. मुश्रीफ म्हणाले,‘श्री. पवार यांना राजकारणाचा दिर्घ अनुभव आहे. राज्यात एखादा प्रश्‍न उभा राहीला तर त्यात श्री. पवार यांनी लक्ष घातले तर बिघडले कुठे ? तीन महिने प्रवासी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीकांचे हाल होत आहेत, कर्मचारी तीन महिने संप करत आहेत, त्यात तोडगा काढण्यासाठी श्री. पवार यांनी भाग घेतला तर यांच्या पोटात का दुखावे ? श्री. पवार यांच्यामुळे महाविकास आघाडी सरकार भक्कम आहे याचे त्यांना झालेले दुःख मी समजू शकतो``

Hasan Mushrif-Chandrakant Patil
मुख्यमंत्री सक्रिय तरीही चंद्रकांत पाटील असं का बोलताहेत; जयंत पाटलांचा प्रश्‍न

कोणाचे तोंड फोडायचे हे जनता ठरवेल, पक्ष वाढवायाचा, त्याचा विस्तार करायचा हे काम पक्षांनी करावे, देशभरातील निवडणुकीत उमेदवार उभे करणे हे पक्षाचे काम आहे, असे श्री. मुश्रीफ यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com