पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता कार्यरत झाले असताना भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrant Patil) त्यांच्याबाबत वारंवार का बोलत आहेत, असा प्रश्न राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उपस्थित केला आहे.याबाबत आता पाटील यांनीच विचारायला हवे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
सांगलीतील पोट निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जयंत पाटील बोलत होते. मानेच्या आजाराने त्रस्त असलेल्या मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर दोन महिन्यांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.त्यानंतर डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्याने मुख्यमंत्री सध्या विश्रांती घेत आहेत.या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थिवर भाजपाकडून वांरवार आक्षेप घेण्यात येत आहे.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री आजारी असतील तर मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार इतरांकडे द्यावा, अशी मागणी वारंवार केली आहे.
राज्यात मुख्यमंत्री सक्रीय नाहीत. त्याचा परिणाम कामावर होत आहे. राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर होत आहे.अशावेळी पूर्णवेळ मुख्यमंत्री ही राज्याची गरज असून ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार इतरांकडे द्यावा, अशी मागणी भाजपाकडून वारंवार करण्यात येत आहे. चंद्रकांत पाटील यांच्याशिवाय याच प्रकारची मागणी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी आज केली आहे.
या संदर्भाने बोलताना जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. उत्तर प्रदेशातील सध्याच्या निवडणुकीच्या संदर्भाने जयंत पाटील यांनी भाजापावर टीका केली. देशातील वातावरण आता बदलू लागले आहे. शेतकरी आंदोलन आणि त्यानंतरच्या घटनांनी राजकीय वातावरणात खूपच फरक पडत आहे. लोक पर्याय शोधत होते.लोकांनी काँग्रेसचा पर्याय निवडला आहे.उत्तरप्रदेश मधील काही मंत्री आणि आमदार भाजपामधून इतर पक्षात जात आहे.याचा अर्थ राज्य कोणत्या दिशेनं जात आहेते स्पष्ट होऊ लागले आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले.
Edited By : Umesh Ghongade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.