कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी हसन मुश्रीफ तर राजूबाबा आवळे उपाध्यक्ष

Kdcc bank update : अध्यक्षपदी हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांची बिनविरोध निवड
Hasan Mushrif - Raju Aawale
Hasan Mushrif - Raju Aawale Sarkarnama

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (KDCC Bank election) अध्यक्षपदी राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांची बिनविरोध निवड झाली. मुश्रीफ यांनी सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपद मिळवले आहे. तर उपाध्यक्षपदी हातकणंगल्याचे आमदार राजू आवळे (Raju Aawale) यांची वर्णी लागली आहे. बँकेचे निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी झाल्या.

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्ष (KDCC Bank Chairman) आणि उपाध्यक्षांची निवड करण्यासाठी आज सकाळी सत्तारूढ पॅनेलच्या १८ संचालकांसह काँग्रेस - राष्ट्रवादीच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही पदांचे उमेदवार निश्चित करण्यात आले. त्यानंतर दुपारी संचालकांच्या बैठकीत या दोन्ही नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. याआधी अध्यक्षपदासाठी हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील अध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार होते. दरम्यान मुश्रीफ यांनी पुन्हा बाजी मारली आहे.

Hasan Mushrif - Raju Aawale
भाजपकडून उत्पल पर्रीकरांचा पणजीतून पत्ता कट! फडणवीसांनीच केली घोषणा

जिल्हा बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सत्तारूढ काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप मित्र पक्षाच्या पॅनेलने २१ पैकी १८ जागांवर विजय मिळवला आहे. तर ३ जागा शिवसेनेला पुरस्कृत पॅनेलला मिळाल्या आहेत. मात्र सत्तारूढ गटातून विजयी झालेल्या राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व माजी खासदार श्रीमती निवेदीता माने हे उमेदवार सेनेचेच असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे त्यांचीही भूमिका काही महत्वाची होती.

Hasan Mushrif - Raju Aawale
भाजपची घराणेशाही जोरात; दोन बडे नेते सपत्नीक मैदानात

तसेच सत्तारूढ गटाच्या नेत्यांनी प्रक्रिया व पतसंस्था गटात विश्वासघात केल्याचा ठपका आमदार विनय कोरे यांनी ठेवला आहे. त्यातून प्रचंड नाराज झालेल्या कोरे यांनी दोन दिवसांपुर्वी मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील यांची भेट घेऊन तुमच्यासोबत मला गृहीत धरू नका असा इशारा दिला आहे. त्यामुळे आजच्या बैठकित कोरे कोणती भुमिका घेणार याविषयी उत्सुकता होती. मात्र ही निवड सामोपचाराने झाल्याचे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com