महायुतीमध्ये सर्व काही अलबेल आहे. याचा प्रत्यय नुकताच गणेशोत्सवात पाहायला मिळाला. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक कागल विधानसभा मतदारसंघात एका कार्यक्रमात असताना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री मुश्रीफ यांच्या बाबत नाराजी व्यक्त केली. या नाराजीनंतर कागल विधानसभा मतदारसंघात महायुती मधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली होती. त्यावर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत धनंजय महाडिक हे त्यांचे नेते आहेत ते त्यांना संदेश देतील, असे स्पष्टीकरण दिले होते.
ससून रुग्णालयातील कथित घोटाळ्यासंदर्भात बोलताना मुश्रीफ म्हणाले, अशी घटना घडते त्यावेळी यांचे तत्काळ माहिती मंत्र्यांनजवळ असते असे नाही. ससूनमध्ये आज पर्यंत तीन प्रकरण झाले आहेत. आता याची चौकशी केली जाईल. असे स्पष्टीकरण मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिले.
आमदार संजय गायकवाड यांनी केले काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या वक्तव्यावर बोलताना, अशी भाषा करणे योग्य नाही. याचे समाजामध्ये विपरीत परिणाम होतात. त्यांनी अत्यंत संयमाने आणि जपून बोलणं गरजेचं आहे, असे सांगितले. आम्ही चार जागेची मागणी केली आहे. कोल्हापूर उत्तर, शिरोळ, कागल आणि चंदगड विधानसभेचे मागणी आम्ही केली असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
गेल्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. यामुळे कार्यकर्ते भेटून आपली भावना व्यक्त करत होते. शेवटी धनंजय महाडिक हे महायुतीचे भाग आहेत. भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत. भाजप महायुतीमध्ये मोठा भाऊ म्हणून कार्यरत आहे. कार्यकर्ते काही बोलले तरी नेतेमंडळी कार्यकर्त्यांना व्यवस्थित आदेश देतील. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल तालुक्यात जाऊन नाराजी व्यक्त केली होती. त्यावर मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.