Hasan Mushrif : 'नविदला अध्यक्ष करणे ही माझी हतबलता' ; मुश्रीफांची एकाच वाक्यात घुसमट बाहेर!

Hasan Mushrif's Statement on Navid's Appointment :खरंतर या निवडीनंतर मोठ्याप्रमाणात उलटसुलट चर्चांना उधाण आलेलं आहे. मुंबईमधून हस्तक्षेप झाल्याचंही बोललं जात आहे. तर कोल्हापूरातील स्थानिक नेत्यांचीही वेगवेगळी विधानं येत आहेत.
Hasan Mushrif explains his stance on appointing Navid as Gokul Dairy chairman, calling it an act of compulsion due to political pressure.
Hasan Mushrif explains his stance on appointing Navid as Gokul Dairy chairman, calling it an act of compulsion due to political pressure. sarkarnama
Published on
Updated on

Hasan Mushrif cites helplessness in appointing Navid as Gokul Dairy chief : सध्या राज्यभर सर्वाधिक चर्चेत असणारा विषय म्हणजे गोकुल दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड. याला कारणही तसंच आहे, ज्याप्रकारे या प्रतिष्ठित दूध संघाच्या अध्यक्षपदी धक्कादयकरित्या नवीन नाव लागतं, ज्या नावाची साधी चर्चाही नव्हती. ते नाव म्हणजे महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री असलेले हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ जे आता या दूध महासंघाचे अध्यक्ष झाले आहेत.

खरंतर या निवडीनंतर मोठ्याप्रमाणात उलटसुलट चर्चांना उधाण आलेलं आहे. मुंबईमधून हस्तक्षेप झाल्याचंही बोललं जात आहे. तर कोल्हापूरातील स्थानिक नेत्यांचीही वेगवेगळी विधानं येत आहेत. आता यावर खुद्द मंत्री हसन मुश्रीफ यांनीच भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.

अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नविद मुश्रीफ यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली, तेव्हा नविद यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले, शिवाय हसन मुश्रीफ यांनी आपल्या मुलास आशीर्वादही दिले. एवढंच नाहीतर नविद यांना गोकुळच्या कारभाराविषयी काही महत्त्वपूर्ण सूचनाही हसन मुश्रीफांना यावेळी केल्या.

Hasan Mushrif explains his stance on appointing Navid as Gokul Dairy chairman, calling it an act of compulsion due to political pressure.
Satej Patil :''गोकुळमध्ये आता अवकाळी पाऊस झाला, पुढे पूर, महापूर येणार'', सतेज पाटलांचे भाकीत!

मंत्री मुश्रीफ म्हणाले,  ‘’पहाटे पाच वाजल्यापासून जनावरांच्या शेणा- मुतात हात घालून काबाडकष्ट करणाऱ्या माता-भगिनींच्या आणि शेतकऱ्यांच्या अपार कष्टातून हा संघ फुलला आहे. गोकुळ दूध संघ म्हणजे शेतकऱ्यांच्या अविरत काबाडकष्टाचे श्रम मंदिर आहे. त्यांना सदैव न्याय देण्यासाठी कटिबद्ध राहा. सहकारात काम करीत असताना सभासद संस्था म्हणजेच शेतकरीच या गोकुळ दूध संघाचे मालक आहेत आणि आपण विश्वस्त आहोत, या भावनेनेच काटकसरीने आणि पारदर्शी काम करा. गोकुळ दूध संघाचा लौकिक उंचावण्यासाठी अहोरात्र कठोर परिश्रम घ्या.’’, असेही ते म्हणाले.

Hasan Mushrif explains his stance on appointing Navid as Gokul Dairy chairman, calling it an act of compulsion due to political pressure.
Shashi Tharoor : शशी थरूर काँग्रेससाठी का आहेत महत्त्वाचे, पक्षातून काढल्यास काय होवू शकते नुकसान?

ही माझी हतबलता.......! -

पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, 'गोकुळ अध्यक्ष पदाच्या निवडीकामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचा मी अत्यंत आभारी आहे. तर,  गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी नविद मुश्रीफ यांचे नाव निश्चित होणे, ही माझी हातबलता होती.'

तसेच,  'प्रत्येक माणसाबद्दल विशेषत: गोरगरिबांबद्दल आणि अगदी शत्रूबद्दलसुद्धा साफ नियत आणि दानत, गेली  ३५-४० वर्षे सामाजिक आणि राजकीय जीवनात कठोर परिश्रम ही पुण्याई माझ्या पाठीशी आहे.' असंही यावेळी हसन मुश्रीफांनी बोलून दाखवलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com