
Overview of Gokul Dairy Federation Elections : 'सर्वपक्षीय नेत्यांनी एकमत करून काल निर्णय घेतला आहे. कोणत्याही पक्षाने हस्तक्षेप केला नाही. शाहू परिवर्तन आघाडी म्हणून आम्ही एकत्र निर्णय घेतला आहे. शशिकांत पाटील, बाबासाहेब चौगुले, अमर पाटील, करणसिंह गायकवाड, अजित नरके हे सर्वजण अध्यक्षपदासाठी इच्छुक होते. मागील चार वर्ष अरुण डोंगळे आणि विश्वास पाटील यांच्याबाबत संभ्रम नव्हता. मात्र उर्वरित एक वर्ष आम्हाला अध्यक्षपद मिळावे असा सर्वांचा आग्रह होता. त्यामुळे सर्वांमध्ये नविद मुश्रीफ यांना अध्यक्षपद देण्याचा एकमत झाले.' अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली, ते कोल्हापुरात बोलत होते.
तसेच राजकीय पातळीवरून गोकुळच्या राजकारणात हस्तक्षेप झाला असे मला वाटत नाही. अरुण डोंगळे यांनी राजकीय विषय केला म्हणून तो राज्यपातळीवर गेला. अन्यथा राजकीय हस्तक्षेप झालाच नाही. काल झालेल्या बैठकीत कुठेही राज्य पातळीवरील नेत्यांच्यावर दबाव नव्हता. शिवाय महायुतीमधील नेत्यांकडूनही अशा पद्धतीचे वक्तव्य आलं नाही. हेच सत्य समजून मी पुढे गेलो असल्याचा खोचक टोलाही आमदार सतेज पाटील यांनी लगावला.
याचबरोबर करवीरला विश्वास पाटील आणि राधानगरीला अरुण डोंगळे यांना अध्यक्षपद मिळाले असा विषय होता. इतर तालुक्यातही अध्यक्षपद द्यावे असा विचार होता. काल दीडतास बैठक झाली. त्यात एकमत झाले. गोकुळ राजकारणात 15 वर्षे मी संघर्ष करत आहे. मागील दहा वर्षात आम्ही प्रयत्न केले होते. त्यावेळी दोन संचालक निवडून आले होते. पण जिल्ह्याच्या या प्रमुख संस्थेवर आम्ही सत्ता मिळवली. अपप्रवृत्तीकडून संघ काढून घेणे यामागचा उद्देश होता. असा टोला देखील सतेज पाटील यांनी लगावला.
याशिवाय, दूध उत्पादक शेतकऱ्यांना चार पैसे जादा मिळावे हा उद्देश होता. हे मागील चार वर्षांत आम्ही दाखवून दिले आहे. मुंबईत अनेक चांगले प्रकल्प आम्ही चालू केले आहेत. पूर्वीच्या काळात एका व्यक्तीकडे गोकुळची सत्ता होती. एकाच व्यक्ती भोवतीच गोकुळ दूध संघ होता. आता मात्र गोकुळ पाच लाख व्यक्तींच्या भोवती आहे. राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीची सत्ता गोकुळवर कायम आहे.
गोकुळची पुढच्या निवडणुकीची चर्चा आज करणे योग्य नाही. पुलाखालून आणि बरेच पाणी वाहणार आहे. अवकाळी पाऊस पडून गेला आहे. पुढची चर्चा करणे आत्ताच योग्य नसल्याचे सांगत आता पाऊस पडला आहे. अजून पूर यायचाय महापूर यायचं बरच काही घडायचं आहे. गोकुळमधील सध्याची स्थिती आहे तशी ठेवण्याचे नेता म्हणून माझा प्रयत्न असल्याची सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
(Edited by -Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.